Menu Close

हज यात्रेकरूंना भाजपकडून साहाय्य

मडगाव – प्रतिवर्षी भाजपकडून हज यात्रेकरूंना यात्रेला जाण्यासोबत अन्य सहकार्यही केले जाते. त्यासाठी भाजपकडून वर्षाकाठी १२.६० लक्ष दिले जातात; मात्र काँग्रेसचे नेते मुसलमानांना भाजपच्या विरोधात भडकवून त्यांची दिशाभूल करतात, असा आरोप अखिल भारतीय हज समितीचे उपाध्यक्ष शेख जीना यांनी केला. (राज्यातून अमरनाथ किंवा वैष्णौदेवीला जाणार्‍या हिंदूंना भाजप साहाय्य करणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

५ जुलै या दिवशी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘या वर्षी हज यात्रेसाठी गोव्यातून १९०, तर कर्नाटक राज्यातून ४०० यात्रेकरू हजला जाणार आहेत. समितीने २२ ते २४ जुलै या कालावधीत झुआरीनगर येथे कर्नाटक आणि गोवा राज्यातील हज यात्रेकरूंसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दोन्ही राज्यांतील एकूण ६९० यात्रेकरू दाबोळी विमानतळावरून हजला जाणार आहेत’, अशी माहितीही जीना यांनी दिली. त्याचप्रमाणे एस्. के. महंमद अली यांनी हज समितीवर केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *