गुरुपौर्णिमा सोहळ्यांच्या थेट प्रक्षेपणाला १७ सहस्रांहून अधिक भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य आध्यात्मिक संघटनांनी १०० हून अधिक ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन केले होते. काही जणांना इच्छा असली, तरी गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित रहाणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वच भाविक आणि हिंदु धर्माभिमानी यांना गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ व्हावा, या अनुषंगाने ९ भाषांमधील (मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती, बंगाली, तमिळ, तेलगू, मल्याळम् आणि नेपाळी) गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
गुरुपौणिमेच्या थेट प्रक्षेपित झालेल्या कार्यक्रमांना हिंदु धर्माभिमानी आणि भाविक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायं. ७.३० वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार १७ सहस्रांहून अधिक जणांनी हे व्हिडिओ पाहिले, तर १ लक्षहून अधिक लोकांपर्यंत गुरुपौर्णिमेचा विषय ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून पोहोचला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात