Menu Close

इसिस’च्या विरोधात सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांना पुढे येऊ देणे चुकीचे असून त्यांना रोखले पाहिजे ! – डॉ. राजेंद्र कांकरिया

‘इसिसच्या विरोधात आम्ही काही करणार नाही आणि सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनाही काही करू देणार नाही’, अशा हीन मनोवृत्तीचे अंनिसवाले !

निगडी (पुणे) : हिंसेचे उत्तर हिंसेने न देता विवेक, संयम आणि मानवता यांद्वारे द्यायला हवे. त्यावर हिंसा हे उत्तर नाही. अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुरोगामी महाराष्ट्रात आणि विद्येचे माहेर असणार्‍या पुण्यात हत्या झाली, तरीसुद्धा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला नाही. अंनिस गेली ४ वर्षे शांतपणे निषेध आंदोलन करत आहे. आपण हिंसेला कारणीभूत न होता हिंसेच्या विरोधात एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची हिंदु राष्ट्राची मागणी आठवते; पण ते गोहत्येविषयी जे बोलले, ते कोणीही सांगत नाहीत. (स्वातंत्र्यवीर सावरकर गोहत्येच्या विरोधात होते, हाच इतिहास आहे. असे असतांना त्यांचे नाव घेऊन गोहत्येचे समर्थन करणारे गोद्रोही अंनिसवाले ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) सध्या नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण चालू आहे. ‘इसिस’ विरोधात सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांना पुढे येऊ देणे चुकीचे असून त्यांना रोखले पाहिजे. (इसिसच्या विरोधात अंनिसवाले काय करतात ? तिच्या विरोधात गप्प बसून हिंदूंना वार्‍यावर सोडायचे, असे अंनिसवाल्यांना अपेक्षित आहेे का ? देशाला आतंकवादापासून रोखण्यासाठी कठोर कारवाई करणे आवश्यक असतांना अंनिसवाले सनातनद्वेषी गरळओक करत आहेत. असे अंनिसवाले समाजाचे भले काय करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) धर्माच्या विरोधात धर्माला पुढे आणणे चुकीचे आहे.

आतंकवादाला आतंकवादाने संपवायला नको, असे प्रतिपादन अंनिसच्या राष्ट्रीय अनुसंधान विभागाचे सहकार्यवाह आणि येथील प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी केले.(अंनिसवाल्यांनी इतिहास न शिकल्याचा परिणाम ! आतंकवाद कसा संपवायचा असतो, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवले आहे. असे असतांना हेच अंनिसवाले उद्या देशाच्या सीमेवरून घुसखोरी करणार्‍या आतंकवाद्यांना रोखण्यासाठी सैन्याला हटवण्याची भाषा वा सैनिकांनीही हिंसा सोडून देण्यास सांगायला कमी करणार नाहीत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) येथील आकुर्डी भागातील इस्लामिक सेंटरपासून ते निगडी येथील भक्ती-शक्ती चौकापर्यंत ‘नॉट इन माय नेम’ या मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे शेवटी अण्णाभाऊ साठे उद्यानामध्ये सभेमध्ये रूपांतर झाले. त्या वेळी ते समारोपीय भाषण करत होते. या मोर्च्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संभाजी ब्रिगेड, शेकाप, दलित पँथर, काँग्रेस, जमात-ए-इस्लामी या संघटनांचे ६० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ते पुढे म्हणाले की, गोध्रा हत्याकांड करणारे आज सत्तेवर बसले आहेत. ‘मुँह मे राम और बगल में छुरी’ असे वर्तन सध्याच्या सत्ताधीशांचे आहे. (काँग्रेस सत्तेवर असतांना ‘शिखांचे हत्याकांड करणारे सत्तेवर बसले आहेत’ किंवा ‘हत्याकांडे करणारे साम्यवादी त्रिपुरा, केरळ येथे सत्तेवर आहेत’, असे वक्तव्य अंनिसवाल्यांनी कधी केले नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘आम्ही ‘असहिष्णुता’ संपवू आणि राज्य आणू’, हा त्यांचा भ्रम आहे.

(म्हणे) ‘मोहसीन शेख हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळणे, हे षङ्यंत्र !’ – प्रा. शमशुद्दीन तांबोळी

काही विशिष्ट गट गोरक्षणाच्या नावाखाली सर्वसामान्यांची हत्या करत आहेत. जात, धर्म, भाषा आणि लिंग यांद्वारे कोणताही अत्याचार सहन केला जाणार नाही. (बंगाल, केरळ, तसेच अन्य राज्यांतही हिंदूंना धर्मांध ठार मारत आहेत. तांबोळी त्याविषयी कधी बोलत नाहीत ! ‘हिंदूंची हत्याकांडे ते खपवून घेतात’, असे हिंदूंनी समजायचे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मोहसीन शेख हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळणे, हे षङ्यंत्र आहे. (असे बोलून तांबोळी यांनी न्यायालयाच्या निर्णयावर अविश्‍वास दर्शवत अवमानच केला आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *