वॉशिंग्टन : टि्वटरने गेल्या काही महिन्यांमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंधित १.२५ लाख खाती (खाती) बंद केली आहेत. ज्यावेळी अन्य वापरकर्ता (युजर) तक्रार करतात त्याचवेळी खाती बंद करण्यात येतात असे टि्वटरने सांगितले आहे. तक्रारींची दखल घेणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यात आल्याचे आणि प्रतिसाद खूपच तत्रेपरतेने देत असल्याचेही टि्वटरने सांगितले आहे.
दहशतवादाचा वाढता धोका आणि त्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा प्रसार रोखण्यासाठी फेसबुकसह अनेक कंपन्यांनी वादग्रस्त पोस्टना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
अर्थात, अशा प्रकारच्या बंदीची मागणी जगभरातल्या देशांकडून राजकीय कारणास्तव करण्यात येईल अशी काळजीही सोशल मीडिया कंपन्यांना वाटत आहे.
संदर्भ : लोकमत