प्रसिद्धीच्या हव्यासापोटी उधळलेल्या सनातनद्वेष्ट्यांना लगाम ! – श्री. अभय वर्तक
गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्धीलोलूप पत्रकार आशिष खेतान यांचा वारू चौफेर उधळला होता. एकेकाळी तरूण तेजपाल यांसारख्यांचा सहकारी राहिलेल्या खेतान यांनी गुजरात दंगलीतील आरोपी बाबू बजरंगी यांचे स्टिंग ऑपरेशन करून त्यांना शिक्षा होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी अनेक प्रकरणांत द्वेषापोटी हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात, तसेच देशद्रोह्यांच्या साहाय्यासाठी न्यायालयाचा गैरवापर केला.
त्यांनी पुण्यातील बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी हिमायत बेग याच्यावरील कथित अन्यायाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांचाच सहकारी असणार्या हर्ष मांधेर यांनीही मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाविषयीही अशीच याचिका दाखल केली; मात्र त्यांच्या शोध (कि प्रतिशोध ?) पत्रकारितेने या प्रकरणात एटीएसने केलेला खोटेपणा पुढे आणला नाही; पण नंतर तो न्यायालयात सिद्ध झाला. तसेच त्यांनी दाभोलकर हत्येप्रकरणी पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त श्री. गुलाबराव पोळ यांचेही स्टिंग ऑपरेशन करून सनातन संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तेथेही केवळ प्रसिद्धीच मिळवली. दाभोलकर हत्या प्रकरणात त्यांच्या या प्लँचेट स्टिंगचा काही संबंध नव्हता; पण त्यातून त्यांनी प्रसिद्धी मात्र मिळवली. नंतर पुन्हा खेतान या विषयाकडे फिरकलेही नाहीत.
त्यामुळे कोणतीही शोध पत्रकारिता न करता निवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी अनेकांना त्रास दिला. परिणामी त्यांना अनेक व्यक्तीगत शत्रूही निर्माण झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खेतान यांना मिळालेल्या कथित धमकीच्या पत्राविषयी कोणतीही शोधपत्रकारिता न करता थेट सनातन संस्थेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांवर बिनबुडाचे आरोप केले. आज न्यायालयाने त्यांनी केलेली याचिका फेटाळल्याने त्यांच्या या प्रसिद्धीच्या हव्यासाच्या उधळलेल्या वारूला सर्वोच्च न्यायालयाने एकप्रकारे लगामच लागला आहे, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी या प्रकरणी दिली. तसेच सनातन संस्थेसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांची नावे घेऊन त्यांना बदनाम केल्याप्रकरणी आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत, असेही श्री. वर्तक म्हणाले.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात