Menu Close

स्वतःतील दुर्गातत्त्व जागृत केल्यास एकही हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाही ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

मार्गदर्शनाला उपस्थित महिला

पुणे : सध्या धर्माचरणाअभावी कुटुंबव्यवस्था ढासळली असून अनेक हिंदु युवती पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अधीन झाल्या आहेत. दुसर्‍या बाजूला धर्मांध हिंदु युवतींना आमिषे दाखवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढत आहेत. युवती आणि महिला यांनी साधनेने स्वत:तील दुर्गातत्त्व जागृत केल्यास एकही हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाही. युवतींनी हिंदु धर्माचा अभ्यास करून त्याप्रमाणे आचरण केले, तर आजची कुटुंबव्यवस्था सावरली जाईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सरचिटणीस सौ. माधवी शर्मा यांनी महिलांसाठी ४ जुलै या दिवशी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी उद्योजिका सौ. मंजुश्री वैद्य यांनी ‘करियर’विषयी मार्गदर्शन केले. या वेळी भाजपच्या शहर उपाध्यक्षा सौ. अंजली कुलकर्णी, महासंघाच्या सौ. लता दवे यांसह २०० महिला उपस्थित होत्या.

क्षणचित्र

कार्यक्रम संपल्यानंतर अनेक युवतींनी शंकानिरसन करून स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *