काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी हिंदुद्रोही पक्षांच्या राज्यात हिंदूंची आणि त्यांच्या संघटनांची मुस्कटदाबी करण्यात येते, तर भाजपशासित राज्यांत धर्मांधांना सर्वप्रकारची मोकळीक असते, हे लक्षात घ्या !
धार (मध्यप्रदेश) : वसंत पंचमीच्या दिवशी नमाजपठण करण्यापूर्वी मुसलमानांनी भोजशाळेत ५ फेब्रुवारी या दिवशी शक्तीप्रदर्शन केले. भोजशाळेत १२ फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या दिवशी हिंदूंना पूजा करण्याची अनुमती असली, तरी मुसलमानांना दुपारी १ ते ३ या वेळेत नमाजपठण करण्याचीही अनुमती देण्यात आली आहे. याचा हिंदुत्ववादी विरोध करत आहेत. हिंदूंच्या या विरोधाला आता मुसलमानांनीही विरोध करणे चालू केले आहे.
१. शुक्रवार, ५ फेब्रुवारीला भोजशाळेतील कमाल मौलाना मशिदीजवळ सहस्रावधी मुसलमान संघटित झाले होते. (किती हिंदु आरतीसाठी अशा प्रकारे मोठ्या संख्येने मंदिरात संघटित होतात ? – संपादक)
२. शुक्रवारच्या नमाजासाठी एकत्र येणार्या मुसलमानांच्या संख्येपेक्षा ही संख्या अनेक पटीने अधिक होती. ही एकप्रकारे हिंदूंना आणि पोलिसांना चेतावणीच असल्याचे मानले जात असून कायदा आणि सुव्यवस्थेवरून प्रशासन चिंतीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
३. वर्ष २००६ आणि २०१३ मध्ये अशाच प्रकारच्या समस्येमुळे येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, असा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे.
४. मागच्या वेळी धर्मजागरण मंच आणि भोज उत्सव समितीने पूजेनंतर भोजशाळा रिकामी करून देण्यास नकार दिल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना बाहेर काढले होते. त्यानंतर काही मुसलमानांच्या उपस्थितीत येथे नमाजपठण करण्यात आले होते.
५. धर्मजागरण मंचचे समन्वयक श्री. गोपाल शर्मा म्हणाले की, आम्हाला ११ फेब्रुवारीपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून आश्वासन मिळाले नाही, तर १२ फेब्रुवारीला आम्ही भोजशाळेत पूर्ण दिवस पूजा करू. शुक्रवारी मुसलमानांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाविषयी बोलतांना शर्मा म्हणाले की, शेजारील गावांतून मुसलमान येथे आले होते. मुसलमानांनी त्यांच्या महिलांना सांगितले आहे की, वसंत पंचमीच्या दिवशी त्यांनी अन्यत्र निघून जावे, यावरून वसंत पंचमीला ते काय करू इच्छितात, हे लक्षात येईल. (जी माहिती हिंदुत्ववादी संघटनांना मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांना का मिळत नाही ? कि पोलीस याकडे दुर्लक्ष करतात ? – संपादक)
६. नमाजाच्या वेळी शहरातील काजी सादिक वकार हाही उपस्थित होता. देशद्रोहाच्या प्रकरणी तो फरार आहे.
७. हिंदुत्ववादी संघटनांनी त्याच्या उपस्थितीचे छायाचित्र असलेल्या पत्रकांचे येथे वाटप केले.
८. या प्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत सादिकच्या संदर्भात चौकशी होत नाही, तोपर्यंत त्याला अटक करण्यात येऊ शकत नाही. (हिंदूंच्या संतांना, तसेच धर्मप्रेमींना पुरावे नसतांनाही अटक करणारे पोलीस देशद्रोहाच्या प्रकरणी फरार असलेल्याला मात्र अटक करण्यास नकार देतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
९. येथे प्रशासनाने आयोजित केलेल्या सद्भावना यात्रेवर हिंदुत्ववादी संघटनांनी बहिष्कार घातला आहे. संघटनांनी आरोप केला आहे की, यात्रेत सहभागी होणार असलेले बहुतेक जण मागच्या वेळी झालेल्या दंगलीत सहभागी होते.
१०. गोपाल शर्मा म्हणाले की, पोलीस मुसलमानांच्या सणांच्या वेळी अशा प्रकारच्या सद्भावना यात्रा का काढत नाहीत ? पोलिसांना केवळ हिंदूंच हिंसाचार करतात, असे वाटते का ? (भाजपच्याच राज्यातील पोलीस हिंदूंशी असे वागत असतील, तर काश्मीर, उत्तरप्रदेश, आसाम, बंगाल, केरळ आदी राज्यांतील पोलीस कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात