Menu Close

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! – ईश्‍वरपूर आणि तासगाव येथे निवेदन

ईश्‍वरपूर येथे नायब तहसीलदार (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी

सांगली : ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने पोलीस निरीक्षक यांना, तर ईश्‍वरपूर येथे नायब तहसीलदार विपीन लोकरे यांना आणि तासगाव येथे नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जत येथे डफळापूर येथील सरदार यशवंतराव जाधव आणि श्री. अशोक चव्हाण यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते. ईश्‍वरपूर येथे श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री बाळासाहेब गायकवाड, गजानन पाटील, मंदार चव्हाण, सुरेश बाबर, सौरभ पाटील यांसह अन्य उपस्थित होते. तासगाव येथे श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. अभिजित घुले, शिवसेनेचे श्री. स्वप्नील पवार यांसह अन्य उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *