भारतातील इंग्रजी वर्तमानपत्रे हिंदुद्वेष करतात, तसेच परदेशातीलही वर्तमानपत्रे करतात, यातून त्यांची पीतपत्रकारिता समोर येते ! त्यामुळे अशा कुख्यात वर्तमानपत्रांवर लोकांनी किती विश्वास ठेवायला हवा हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
न्यूयॉर्क : हिंदु युवा वाहिनी ही आतंकवादी संघटना आहे आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या संघटनेचे प्रमुख आहेत, असा उल्लेख अमेरिकेतील प्रसिद्ध वर्तमानपत्र न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे. (आतंकवादी कोणाला म्हणतात, हेही माहिती नसणारे न्यूयॉर्क टाइम्स ! हिंदु युवा वाहिनी आतंकवादी असती, तर भारतातील जिहादी आतंकवाद केव्हाच नष्ट झाला असता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आधीपासूनच द्वेषपूर्ण भाषा वापरत असलेल्या महंतांकडेच देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्याचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे, असेही त्यात म्हटले आहे. भारतात एक फायरब्रॅण्ड हिंदु पुजारी राजकीय शिड्या चढत आहे या शीर्षकांतर्गत योगी आदित्यनाथ यांच्याविषयी लिहिलेल्या लेखात हा उल्लेख करण्यात आला आहे. (हिंदूंचे एक महंत राजकारणात पुढे जात आहेत, याचा किती जळफळाट ख्रिस्त्यांना होतो, हे येथे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
लेखात पुढे म्हटले आहे की,
१. योगी आदित्यनाथ यांना बहुतांश लोक योगीच म्हणतात. योगी वातानुकूलित यंत्रणेचा वापर करत नाहीत आणि भूमीवरच झोपतात.ते अतिशय अल्प जेवतात. (ख्रिस्त्यांच्या चर्चमधील पाद्य्रांची वासनाकांडे समोर येत असतांना हिंदूंच्या महंतांचेहे वागणे किती आदर्श आहे, हे समजते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. हिंदू आतंकवादाच्या सर्वोच्च जातीवादी परंपरेचे केंद्र असलेल्या मंदिराचे पुजारी अशी योगींची प्रमुख ओळख आहे. त्यांनी मुसलमान शासकांच्या ऐतिहासिक चुकांचा सूड घेण्यासाठी एका सेनेची स्थापना केली आहे. दोन पायांच्या जनावरांची (मुसलमानांची) वाढ रोखणे हे या सेनेचे ध्येय आहे. (अमेरिकेने मध्य-पूर्वेत आणि स्वतःच्या देशात रेड इंडियन आणि अश्वेत (निग्रो) लोकांची वाढ रोखण्यासाठी किती हिंसाचार केला आहे, हे न्यूयॉर्क टाईम्स का छापत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. एकदा निवडणुकीच्या प्रचार सभेत भाषण करतांना आम्ही सर्व धार्मिक युद्धासाठी सिद्ध आहोत, असे त्यांनी जोरात ओरडून सांगितले होते. (आम्ही भारताला खिस्तमय करणार आहोत, असे पोप यांनी म्हटले होते, हे न्यूयॉर्क टाईम्स का विसरतो ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. विकासाचे सूत्र घेऊन ३ वर्षांपूर्वी केंद्रातील सत्ता मिळवल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आता पालटले आहे. विकासाऐवजी आता हिंदुत्वाचे धोरण पुढे आणले जात आहे. भारताला हिंदु राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या मोदी यांच्या लोकानुनयी धोरणामुळे विकासाचे धोरण मागे पडले आहे. (असेच प्रत्यक्षात असते, तर हिंदूंना आनंद झाला असता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
५. देशातील १७ कोटी मुसलमान आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत. (भारतातील मुसलमान जगातील कुठल्याही देशातील मुसलमांपेक्षा अधिक सुविधा उपभोगतात, ही वस्तूस्थिती जगाने स्वीकारली आहे. तरीही भारतातील मुसलमानांचा इतकाच कळवळा असेल, तर अमेरिकेने त्यांना त्यांच्या देशात घेऊन जाऊन त्यांची स्थिती सुधारावी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात