Menu Close

काश्मीर आणि पश्चिम बंगाल येथील शासन बरखास्त करून लष्करी राजवट लागू करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

पिंपरी : सध्या चालू असलेल्या अमरनाथ यात्रेवर १० जुलैला रात्री आतंकवाद्यांनी आक्रमण करून ७ भाविकांना ठार केले, तर अनेक जण घायाळ झाले. याचसमवेत पश्चिाम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यात धर्मांधांकडून हिंदू नागरिक आणि महिला यांच्यावर अत्याचार करत त्यांची घरे जाळण्यात आली. वरील दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी येथील हिंदुत्वनिष्ठांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ११ जुलै या दिवशी निषेध आंदोलन करण्यात आले. १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रप्रेमी आणि धर्माभिमानी यांनी यात सहभाग घेतला. सर्व हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनामध्ये काश्मीर आणि पश्चिम बंगाल येथील शासन बरखास्त करून तेथे लष्करी राजवट लागू करावी, अशी एकमुखी मागणी केली. यासमवेत अनेक हिंदुत्वनिष्ठांनी हिंदूंवर झालेल्या आक्रमणाविषयी अंनिसवाले, तथाकथित पुरोगामी आणि संभाजी ब्रिगेड हे गप्प का ?, असे विचारत त्यांचा यथोचित समाचार घेतला.

आंदोलनाच्या सांगतेवेळी अमरनाथ यात्रेवर झालेल्या आक्रमणाच्या वेळी मृत्यू झालेल्या नागरिकांसाठी २ मिनिटे श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या मृतांना पुढील गती मिळावी, यासाठी उपस्थितांनी तेवढा वेळ श्री गुरुदेव दत्त हा नामजप केला.

फेसबूक लाईव्हद्वारे १८ सहस्रांहून अधिक जणांनी आंदोलन अनुभवले !

फेसबूक लाईव्हद्वारे आंदोलनाचे थेट प्रसारण करण्यात आले. हे आंदोलन प्रत्यक्षपणे १८ सहस्र ७०० हून अधिक जणांनी पाहिले, तर या आंदोलनाची लिंक ६४ सहस्र ११३ लोकांपर्यंत पोचली.

हिंदुत्वनिष्ठांचे उद्बोधक विचार

१.  श्री. अशोक यलमार, पश्चिम महाराष्ट्र धर्मप्रसारप्रमुख, विहिंप : अमरनाथ यात्रेवरील आक्रमण हे समस्त हिंदूंवर केलेले आक्रमण आहे. केंद्रशासनाने काश्मीरमधील शासन बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, तसेच इस्रायलचा आदर्श घेऊन आक्रमणाचा प्रतिशोध म्हणून पाकिस्तानवर कठोर कारवाई करावी.

२. अधिवक्ता श्री. देवदास शिंदे, लष्कर-ए-हिंद : अतिरेक्यांना धर्म नसतो, तर मरणाऱ्यांना धर्म असतो. हिंदूंनी फक्त मरणासाठी जन्माला यायचे का ? ज्या स्थानिकांनी अतिरेक्यांना साहाय्य केले, त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. हिंदूंनी येथून पुढे अमरनाथ यात्रेला जातांना शस्त्र अनुज्ञप्ती घेऊन तेथे जाण्याची आवश्यकता आहे. आतंकवाद्यांनी एका हिंदूला मारल्यास १०० आतंकवाद्यांना मारले पाहिजे. आतंकवाद्यांनी लक्षात ठेवावे की, भारतातील समस्त हिंदूंनी शस्त्र उचलून काश्मीरवर चाल केल्यास एकही धर्मांध किंवा आतंकवादी शेष रहाणार नाही.

३. श्री. नितीन वाटकर, गोरक्षा समिती : आज काश्मीरमध्ये १ टक्का हिंदू शेष आहेत. त्याला समाजवादी, पुरोगामी आणि धर्मांध यांची मानसिकता कारणीभूत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मानसिकतेनेच हिंदु राष्ट्र आणायला हवे.

४. श्री. नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती : अमरनाथ यात्रेवरील आक्रमण हे पूर्वनियोजित असतांना केंद्रशासन ते का रोखू शकले नाही. केंद्रशासनाने पाकिस्तानात घुसून हाफिज सईदला ठार मारून प्रतिशोध घेतला पाहिजे. बंगालमध्ये होत असलेल्या दंगलीला कारणीभूत म्हणून सात्त्विक सरकार याला अटक केली असून त्याला तात्काळ सोडून द्यावे आणि त्याला संरक्षण दिले पाहिजे.

श्री. अशोक महाराज पवार, विहिंप; श्री. महेश शर्मा, बजरंग दल; श्री. सचिन थोरात, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान; श्री. धनंजय गावडे, केंद्राई गोशाळा आणि श्री. चंद्रशेखर तांदळे, सनातन संस्था यांनीही या वेळी प्रखर शब्दांत प्रबोधन केले.

क्षणचित्रे 

१. आंदोलनाला १५ हून अधिक पोलीस बंदोबस्ताला उपस्थित होते, तसेच त्यांनी आंदोलनाचे ध्वनिचित्रीकरण केले.

२. आंदोलन भरचौकामध्ये असल्याने बस आणि रिक्शा यांमधील नागरिक अन् दुचाकीस्वार हे आवर्जून आंदोलन पहात होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *