Menu Close

गुन्हेगारांना लवकर अटक करावी ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

हिंदू एकता आंदोलन’च्या कार्यकर्त्यांवर आक्रमण

कोल्हापूर : येथील आझाद गल्ली येथे रहाणारे हिंदू एकता आंदोलन संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. सुरेश काकडे (वय ५५ वर्षे) आणि श्री. योगेश घोसरवाड (वय ३५ वर्षे) यांच्यावर ८ जुलै या दिवशी १० जणांच्या टोळीने तलवारीने प्राणघातक आक्रमण केले. या प्रकरणी गुन्हा नोंद होऊनही आरोपी अद्याप पळून गेले आहेत. तरी या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांना लवकर पकडून अटक करावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना १० जुलैला दिले. या वेळी डॉ. अमृतकर यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकर अटक केली जाईल. यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे सांगितले.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

हिंदू एकता आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सर्वश्री चंद्रकांत बराले, अण्णा पोतदार, सुरेश ओतारी, विराज ओतारी, नितीन कवडे, कपील काकडे, हिंदु महासभेचे शहराध्यक्ष श्री. मनोहर सोरप, उपाध्यक्ष सौ. रश्मी आडसुळे, सुवर्णा पवार, शिवसेनेचे सर्वश्री दुर्गेश लिंग्रस, किशोर घाटगे, सौ. सविता काकडे, वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे श्री. अवधूत भाट्ये, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री बाबा पार्टे, प्रकाश भुयेकर, दीपक मगदूम, विजय करजगार, संजय करजगार आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. या घटनेची चर्चा सर्वत्र चालू असून पालकांनी त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक धोरणात मुलींच्या संरक्षणाविषयी नव्या अध्यायाची पोलीस खात्याकडून अपेक्षा केल्या आहेत. याची नोंद घेऊन समाज संस्कृतीमधील एकतर्फी प्रेमातून होणार्‍या तक्रारींची पोलीस खात्याने योग्य अन्वेषणातून संघर्षविना नोंद घेणे आवश्यक आहे.

२. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आक्रमणानंतर धमकीचे भ्रमणभाष श्री. काकडे यांना येत असून आरोपी हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्याचे हे सिद्ध होते.

३. अशा निंदनीय घटनांची पुनरावृत्ती होणार असल्याचे नाकारता येत नाही. तरी अन्वेषणातून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *