चेन्नई : येथील कोलाथूर भागात असलेल्या पद्म सीनिवासन मेमोरियल विद्यालयात विळक्कु पुजै अर्थात् दीपपूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांच्या पालकांना पूजन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयाच्या व्यवस्थापनाने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना पालकांचे मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले होते.
या वेळी समितीच्या सौ. सुगंथी जयकुमार यांनी मुलांना घडवण्यासाठी पालकांच्या दायित्वासंदर्भात दिशादर्शन केले. राजमाता जिजाबाई यांनी छत्रपतींना कसे घडवले, याविषयी माहिती देऊन सौ. सुगंथी यांनी छोट्या-छोट्या कृतींच्या माध्यमातून मुलांना राष्ट्र आणि हिंदु धर्म यांचे बाळकडू कसे देऊ शकतो, याविषयी उपस्थित पालकांना सांगितले. या वेळी ५० पालक उपस्थित होते.
विद्यालयाचे प्राचार्य श्री. राजाराम आणि उपप्राचार्य श्रीमती तमिळ सेल्वी हे मुलांमध्ये राष्ट्र-धर्माविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी विविध उपक्रमांचे वरचेवर आयोजन करत असतात. (विविध उपक्रामांच्या माध्यमातून मुलांमध्ये राष्ट्र-धर्मप्रेम निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारे प्राचार्य श्री. राजाराम आणि उपप्राचार्य श्रीमती तमिळ सेल्वी यांचे अभिनंदन ! देशातील अन्य शाळा-महाविद्यालयांनीही या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत ! – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात