Menu Close

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

चोपडा : आतंकवादी डॉ. झाकीर नाईक यांच्या बंदी घातलेली ’इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’ ही संस्था आणि त्यांचे फेसबूक खाते त्वरित बंद करण्यात यावे, साध्वी प्रज्ञासिंह यांना खोट्या आरोपाखाली ८ वर्षे कारागृहात डांबणारे आणि अनन्वित अत्याचार करून षड्यंत्र रचणारे पोलीस आधिकारी आणि राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करण्यात यावी, नक्षलवादी कारवायांत गुंतलेल्या देशद्रोही प्रा. नंदिनी सुंदर आणि मानवाधिकार कार्यकर्त्या बेला भाटीया यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

सकाळी ११.३० वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन करून मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर आंदोलनकांनी त्यांच्या वरील मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांना दिले. या वेळी चोपडा कृ.उ.बा. उपसभापती नंदकिशोर पाटील, हिंदु जनजागृती समितीचे यशवंत चौधरी, सुधाकर चौधरी, सुनीता व्यास, मनीषा माळी, रणरागिणी शाखेच्या क्षिप्रा जुवेकर, कु. रागेश्री देशपांडे, सनातन संस्थेचे साधक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निलेश सोनार, चेतन बिऱ्हाडे, प्रवीण जैन आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *