गुडगाव (हरियाणा) : येथील महमदपूर झाडसा या गावात ३० आणि ३१ जानेवारी या दिवशी किसान धाम श्री लाडवा गोशाळेचे श्री. नरेश कौशिक यांनी गोपॅथी (गोउत्पादनाद्वारे करण्यात येणारे उपचार) निवासी शिबिराचे आयोजन केले होते. हरियाणामधील अनेक जिल्ह्यांतून ३०-४० युवक या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. या शिबिरात प्रामुख्याने गायीचे दूध, शेण आणि गोमूत्र यांपासून उत्पादने बनवणे यावर भर दिला गेला. सर्व शिबिरार्थींना उत्पादने बनवायच्या पद्धतीसह त्यासाठी लागणार्या प्रमाणाची छापिल प्रत देण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. विनय पानवळकर यांनी गायीचे आध्यात्मिक महत्त्व, धर्मशिक्षण आणि धर्मरक्षण यांचे महत्त्व सांगितले. या निमित्ताने सनातनची सात्त्विक उत्पादने, ग्रंथ आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात