Menu Close

(म्हणे) गोमांस खाण्याचा सर्वांना अधिकार आहे – रामदास आठवले

अशी वक्तव्ये करून जाणून-बुजून हिंदूंच्या धर्मभावना दुखावणा-या रामदास आठवले यांच्यावर कार्यवाही करायला हवी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे – संपादक, हिंदुजागृति

नवी देहली : गोरक्षकांच्या नावे नरभक्षक बनू नका, गोमांस खाण्याचा अधिकार सर्वांना आहे, असे खडे बोल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कथित गोरक्षकांना सुनावले आहेत !

देशात गोमांस किंवा जनावरांची वाहतूक केल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांकडून झालेल्या मारहाणीत अनेकांनी आपल्या जीव गमवावा लागला आहे. यावर बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की, गोमांस खाण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यामुळे गोरक्षकांच्या नावे नरभक्षक बनू नका. तसेच, गोरक्षकाच्या नावाखाली कोणालाही मरेस्तोवर मारहाण करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे करणाऱ्या गोरक्षकांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. (ही स्थिती का येते याचा आठवले यांनी कधी विचार केला आहे. राज्यात गोहत्याबंदी कायदा असताना देखील उघडपणे गायींची वाहतूक व गोहत्या करण्यात येते. याविषयी आठवले काही का बोलत नाही ? – संपादक, हिंदुजागृति)

 

स्त्रोत : लोकमत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *