कर्नाटकातील हिंदुत्वनिष्ठ शरत यांच्या हत्येचे प्रकरण
स्वतः मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणी लक्ष दिले असून गुन्हे प्रविष्ट झालेल्या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला
टिपू सुलतानसारख्या रक्तपिपासू आणि हिंदुद्वेष्ट्या शासकाची शासकीय स्तरावर जयंती साजरी करणारे, गोरक्षक प्रशांत पुजारी यांच्या धर्मांधांनी केलेल्या निर्घृण हत्येच्या विरोधात कोणतीही कारवाई न करणारे आणि हिंदु धर्माच्या मूळावर घाव घालण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करू पहाणारे काँग्रेसचे कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि हिंदुद्रोही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा करणार ? थोडक्यात काँग्रेसच्या राज्यात हिंदूंचा छळ आणि आतंकवादी अन् देशद्रोही यांना संरक्षण असेच असणार ! यासाठी केवळ ‘काँग्रेसमुक्त भारत’ करून उपयोग नाही, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक झाले आहे !
मंगळुरू : रा.स्व. संघाचे कार्यकर्ते शरत मडिवाळ यांच्या हत्येच्या प्रकरणात एक आठवडा उलटून गेल्यानंतरही अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या हत्येनंतर सरकारच्या विरोधात आंदोलन करणार्या हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात मात्र गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लक्ष दिले असून त्यांनी गुन्हे प्रविष्ट झालेल्या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
१. ७ जुलै या दिवशी शरत यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी झालेल्या दगडफेकीच्या संदर्भात भाजपचे खासदार नलिनकुमार कटिल, शोभा करंद्लाजे, संघाचे डॉ. कल्डक प्रभाकर भट, सुनील कुमार यांसमवेत भाजप आणि संघ परिवाराच्या २०० कार्यकर्त्यांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. यात काही जणांवर हत्येचा प्रयत्न असाही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
२. अशांततेला कारणीभूत असलेल्या मुसलमान संघटनांवर कोणताही गुन्हा प्रविष्ट करण्यात आलेला नाही; मात्र हिंदु संघटनांना लक्ष्य करण्यात येत आहे. यावरून उद्रेक झाल्यास त्याला सरकार उत्तरदायी असेल, असे या संघटनांकडून सांगण्यात आले आहे.
३. भाजपचे नेते सी.टी. रवि यांनी आरोप केला की, येथील हिंसाचारामागे इसिसचा हात आहे. त्यातूनच हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होत आहेत. हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग नाही, तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून याचे अन्वेषण केल्यास सत्य बाहेर येईल, अशी मागणीही त्यांनी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात