कोची : केरळ राज्यातील मुसलमानांचा मुला-मुलींचा जलद गतीने वाढता जन्मदर हा राज्यातील लोकसंख्येचे संतुलन पालटेल, असे प्रतिपादन केरळचे माजी पोलीसप्रमुख टी.पी. सेनकुमार यांनी केले आहे. ते एका स्थानिक वृत्तपत्रास मुलाखत देत होते.
सेनकुमार म्हणाले, ‘‘केरळ राज्यात मुसलमानांची लोकसंख्या २७ टक्के आहे; परंतु त्यांचा जन्मदर ४२ टक्के एवढा अधिक आहे. हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्के असून जन्मदर मात्र ४८ टक्क्याहून खूपच न्यून प्रमाणात आहे, तर १९.५ टक्के लोकसंख्या असलेल्या ख्रिस्त्यांचा जन्मदर १५ टक्के आहे. तरीही ख्रिस्ती समुदायाची लोकसंख्या न्यून झालेली नाही; कारण ते मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करत आहेत.’’
इस्लामिक स्टेट आणि संघ यांच्यात तुलना होऊ शकत नाही
जेव्हा आपण इस्लामिक स्टेटविषयी बोलतो, तेव्हा अनेक मुसलमान संघाच्या अस्तित्वाविषयी विचारतात. त्यांना हे समजले पाहिजे की, इस्लामिक स्टेट आणि संघ यांच्यात तुलना होऊ शकत नाही. राष्ट्रीयतेच्या विरोधात जात असलेल्या धार्मिक अतिरेकाविषयी मी बोलत आहे, असे सेनकुमार म्हणाले.
माजी पोलीस प्रमुखांनी सांगितले की, केरळ पोलिसांनी मुसलमान समाजातील ५१२ जणांची पोलिसांत भरती करून मुसलमानांना कट्टरतावादापासून परावृत्त करण्याचा उपक्रम चालू केला आहे. (काश्मीरमध्ये असे पोलीस शस्त्र घेऊन आतंकवाद्यांना जाऊन मिळाले, हा आपला अनुभव असतांना असा उपक्रम हाती घेणार्या केरळच्या पोलिसांना आत्मविश्वास कुठून आला ? – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
लव्ह जिहाद
सेनकुमार म्हणाले की, मुसलमानांनी ‘लव्ह जिहाद’चा पुरस्कार करण्यापासून दूर रहावे. मुसलमान पुरुषांनी इतर धर्मांतील मुलींना खोट्या प्रेमापोटी वश करून इस्लाममध्ये धर्मांतरित केल्याच्या आरोपावर विश्वास ठेवण्यास मुसलमान नकार देतात. त्यांच्या मते यात धर्माचा संबंध नसून ती केवळ वैयक्तिक प्रेम प्रकरणे आहेत.
त्यांच्या या मतांमुळे वाद निर्माण झाला आहे आणि सामाजिक प्रसारमाध्यमातील अनेकांनी त्यांच्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मग अशी प्रकरणेे केवळ मुसलमान युवक आणि गैर-मुसलमान तरुणी यांच्यातच का होतात ? उलट दिशेने का होत नाहीत ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात