रायगड
नवीन पनवेल येथे कल्याण येथील अधिवक्ता श्री. विवेक भावे, पेण येथे अधिवक्ता श्री. श्रीराम ठोसर आणि उरण येथे हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. दीप्तेश पाटील यांनी हिंदु धर्माची सद्यस्थिती आणि हिंदु संघटनाची आवश्यकता यांविषयी उपस्थितांना अवगत केले. गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ नवीन पनवेल येथे २००, उरण येथे ६० आणि पेण येथील १२५ जिज्ञासूंनी घेतला.
जिल्ह्यात वावे (ता. अलिबाग) येथे गुरुपौर्णिमेनिमित्त धर्माभिमान्यांसाठी राष्ट्र आणि धर्म जागृतीपर व्याख्यानाचेही आयोजन केले होते. या वेळी उपस्थितांना हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. जगन्नाथ जांभळे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधनेची आवश्यकता या विषयावर सौ वंदना आपटे यांनी संबोधित केले. याचा लाभ ६३ धर्माभिमान्यांनी घेतला. येथे उपस्थित असलेले बहुतेक सर्व धर्माभिमानी शेतकरी कुटुंबातील होते. सध्या शेतातील लागवणीचे दिवस असूनही या व्याख्यानाची सर्व सिद्धता धर्माभिमान्यांनी पुढाकार घेऊन केली होती. व्याख्यानानंतर झालेल्या आढावा बैठकीत सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. काहींनी आम्ही स्वत: धर्मशिक्षणवर्ग घेऊ, अशी सिद्धता दर्शवली.
उपस्थित मान्यवर
१. नवीन पनवेल येथील कार्यक्रमाला नवीन पनवेल येथील नगरसेविका सौ. चारुशीला घरत, नगरसेवक श्री. तेजस कांडपीळे, किल्ले कर्नाळा गाव सरपंच सौ. निवेदिता शेखर कानडे, श्री. मोतीलाल जैन, देवद येथील श्री. संदीप वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
२. पेण येथे शिवसेना शहरप्रमुख श्री. आेंकार दानवे आणि शिवसेना युवासेना प्रमुख श्री. चेतन मोकल हे उपस्थित होते.
३. उरण येथे राजस्थान येथील धर्मप्रेमी नोकरीनिमित्त राहतात. तेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांना कार्यक्रम आवडल्याने त्यांनी ‘आमच्याही गावात अशा स्वरूपाचा कार्यक्रम घ्या’, अशी मागणी केली.
नाशिक
‘गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः ।’ या अमृतवचनानुसार ९ जुलै या दिवशी सनातन भारतीय संस्कृती संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सुदर्शन हॉल येथे मंगलमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा झाला. गुरूंंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या महोत्सवाला २८० हून अधिक भाविकांची उपस्थिती होती.
या सोहळ्याचा आरंभ संत भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला. नंतर श्रीमती श्यामला देशमुख आणि सौ. धनलक्ष्मी क्षत्रिय यांनी उपस्थितांना साधनेचे महत्त्व विषद केले. यानंतर सनातनचे संतपू. महेंद्र क्षत्रिय यांनी सनातनचे गुणवंत विद्यार्थी चि. संकेत कातकाडे आणि ऋषि देशमुख यांचा सत्कार केला. तर पू. महेंद्र क्षत्रिय यांचा सन्मान श्री. निळकंठ नाईक यांनी केला.
दुसर्या सत्राचा आरंभ श्री. शिवाजी उगले यांनी शंखनादाने केला. तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शुभसंदेशाचे वाचन श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी केले.
या महोत्सवाच्या दुसर्या सत्रामध्ये श्री. ज्ञानेश्वर भगुरे मार्गदर्शनात म्हणाले, ‘‘आजच्या निरर्थक लोकशाहीमुळे समाजाची, राष्ट्राची अन् धर्माची हानी झाली आहे. पोलीस प्रशासन, आमदार, खासदार असो कि न्यायपालिका अशा सर्वच यंत्रणा बहुतांशी भ्रष्ट झाल्या आहेत. सैनिकांवर दगडफेक केलेली चालते; मात्र गोरक्षा करणार्यांना अपराधी समजले जात आहे. त्यामुळे समाजाने भ्रष्टाचाराविरुद्ध लढले पाहिजे. त्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेचे साहाय्य घेऊ शकतो.’’
रामाने रावणाचा, श्रीकृष्णाने कंसाचा, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याचा हिंदूंचा सिंहासारखा इतिहास असतांना आज तो बकरीसारखा, कणाहीन झाला आहे. धर्मांध जिहाद्यांद्वारे लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, सेक्स जिहाद असे १४ प्रकारचे जिहाद भारतात आहेत. इसिससारख्या क्रूर संघटनांचे अतिरेकी देशात सापडत आहेत. त्यामुळे हिंदूंनी बकर्यांसारखे जिणे सोडून क्षात्रवृत्ती, बलतेजसंपन्न विजीगुषी वृत्ती वाढविण्याची आवश्यकता असल्याचे क्षात्रतेज जागृत करणारे विचार श्रीमती वैशाली कातकाडे यांनी मांडले.
त्यानंतर सनातनच्या युवा साधकांनी विविध स्वसंरक्षण प्रात्यक्षिकेही उपस्थितांसमोर करून दाखवली. या महोत्सवाची सांगता श्री गुरूंंच्या श्लोकाने झाली. सभागृहाबाहेर विविध प्रबोधनपर फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
क्षणचित्रे
१. एका स्थानिक पोलीस अधिकार्याने गुरूंच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन प्रसाद घेतला आणि काही वेळ कार्यक्रम ऐकला.
२. एका वाचकाने सनातनचे १९ ग्रंथ खरेदी केले.
३. श्रोते आरंभापासून अखेरपर्यंत एकचित्ताने कार्यक्रम ऐकत होते.
४. एका स्थानिक वृत्तपत्रातील या कार्यक्रमाची बातमी वाचून ऑस्ट्रेलिया येथून आलेले एक पारसी कुटूंब श्री. श्याम हरियाली आणि त्यांची पत्नी गुरुपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी संपूर्ण गुरुपूजन बघितले आणि ‘हा कार्यक्रम पुष्कळ छान आहे, लक्ष देऊन ऐकले, तर सर्वांचे कल्याण होईल’, अशी प्रतिक्रिया दिली.
चंद्रपूर
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लोकशाहीतीलदुष्पवृत्तींचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यासाठी सिद्ध होऊया ! – श्री.धीरज राऊत
भारताला श्रीरामापासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत गौरवशाली इतिहास लाभला आहे. काँग्रेसी नेत्यांनी लोकशाही व्यवस्था स्वीकारून या देशाची दयनीय स्थिती करून टाकली. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण आरक्षण आदी सगळीकडे दृष्टीस पडत आहे. देशाची अधोगतीकडे जाणारी वाटचाल थांबवण्यासाठी लोकशाहीतील दुष्पवृत्तींचे निर्मूलन करण्यासाठी पुन्हा एकदा आदर्श राज्यव्यवस्थेची अर्थात धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल. त्यासाठी आजच्या गुरुपौर्णिमेच्या मुहुर्तावर आपण कटीबद्ध होऊया, असे प्रतिपादन श्री. धीरज राऊत यांनी केले. येथील पठाणपुरा रोड येथील जैन भवन येथे पार पडलेल्या भावपूर्ण गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते. सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांनी हा महोत्सव आयोजित केला होता.
शौर्य जागरणाची आवश्यकता याविषयावर मार्गदर्शन करतांना सौ. भक्ती चौधरी म्हणाल्या, ‘‘आज मुठभर दुष्पप्रवृत्तींमुळे समाज असुरक्षित बनला आहे. अन्याय आणि अत्याचार यांचा प्रतिकार कधी करावा लागेल, ते सांगता येत नाही. समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करायचे असेल, तर स्वयंसिद्ध होण्याविना पर्याय नाही, त्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या आणि इतरांनाही द्या.’’
‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून १४ लाख ५० सहस्र जिज्ञासूंनी गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ घेतला. ८ भारतीय भाषांत गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा झाला.
गुरुपौर्णिमा महोत्सवामधील कार्यक्रम
गुरुपौर्णिमा सोहळ्यामध्ये आरंभी संत भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेल्या शुभसंदेशाचे वाचन करण्यात आले. संस्थेच्या वतीने ‘सामाजिक दुष्प्रवृत्तींचा संघटित प्रतिकार आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेचे कार्य !’, तसेच ‘हिंदु समाजामध्ये शौर्यजागरणाची आवश्यकता !’, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि देशभरातील विविध संघटना यांच्या वतीने देशभरात राष्ट्र आणि धर्मजागृती यांसाठी करण्यात आलेल्या विविध उपक्रमांविषयीची एक ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. सनातनच्या गुणवंत विद्यार्थी साधकांचा सत्कार करण्यात आला. सनातनच्या युवा साधकांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके करून दाखवली.
यवतमाळ
सनातन संस्था, धर्मप्रचार सभा न्यास आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथील श्री साई सत्यज्योत मंगल कार्यालयात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या भावपूर्ण सोहळ्याचा आरंभ गुरुपूजनाने झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘परिपूर्ण व्यष्टी आणि समष्टी साधना हीच खरी परात्पर गुरुंप्रती कृतज्ञता’, या विषयावर सौ. हरणे यांनी साधनेविषयी केलेल्या अनमोल मार्गदर्शनाने सर्वांचीच भावजागृती झाली अन् सर्व साधकांनी मनोमन साधनेची घडी बसवण्याचा ठाम निश्चय केला.
दुसर्या सत्रात परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन समितीचे श्री. मंगेश खांदेल यांनी केले.
शौर्य जागरणाची आवश्यकता या विषयावर सनातन संस्थेच्या सौ. माधुरी मोरे यांनी मार्गदर्शन केले.
अन्यायी राजव्यवस्थेविरुद्ध जागरण करुन धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक – श्री. श्रीकांत पिसोळकर, विदर्भसमन्वयक, हिंदु जनजागृती समिती
सामाजिक दुष्पवृत्तींचा प्रतिकार आणि धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य या विषयावर बोलतांना श्री. पिसोळकर म्हणाले, ‘‘ज्या ज्या वेळेस येते ग्लानी येते, त्यावेळेस गुरु-शिष्य परंपरेनेच धर्मसंस्थापना केली आहे. आर्य चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्य यांच्या माध्यमातून विजय मिळविला, तर समर्थ रामदासस्वामी यांनी शिवाजी महाराजांच्या माध्यमातून पाच पाच पातशाह्या संपवल्या. ही आहे गुरुशिष्य परंपरा. आजही धर्माला ग्लानी आलेली आहे. या अन्यायी राज्यव्यवस्थेविरुद्ध जागरण करून धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याची आज आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना या गुरूंच्या समष्टी कार्यासाठी वाहून घेऊ, तेव्हाच गुरूंची कृपा होईल.’’
या कार्यक्रमाला ३५० जण उपस्थित होते.
वणी (जिल्हा यवतमाळ)
धर्मप्रचार सभा आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण आणि उत्साहात एस्बी लॉनच्या प्रशस्त सभागृहात पार पडला. सकाळी ११ वाजता व्यासपूजन आणि संत भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन झाले.
श्रीगुरुपूजनानंतर ‘परिपूर्ण व्यष्टी आणि समष्टी साधना हीच खरी परात्पर गुरूंप्रती कृतज्ञता’ या विषयावरील मार्गदर्शन सनातनचे साधक श्री. लहू खामणकर यांनी केले.
‘सामाजिक दुष्प्रवुत्तीविरोधी लढा संघटितपणे देणे आवश्यक’ या विषयावर मार्गदर्शन करतांना सौ. सुनीता जमनारे म्हणाल्या ‘‘समाजातील दुष्प्रवुत्तीविरुद्ध संघटितपणे लढा दिल्यास त्याचा परिणाम फलदायी होतो, त्यासाठी संघटित व्हा.’’
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या कार्याचा केलेला गौरव, त्यासाठी देवळांमध्ये घातलेले साकडे, दिंड्या, महामृत्युंजय विधी, शौर्य जागरण आदी उपक्रमांचा या वेळी दाखवण्यात आलेला दृश्यपट पाहून कृतज्ञता दाटून उपस्थितांची भावजागृती झाली.
सद्यस्थितीत संघर्षाला तोंड देण्यासाठीशौर्याची आवश्यकता ! – श्री. हेमंत खत्री
स्वातंत्र्यसमराचा धसका घेतल्यानंतर इंग्रजांनी ‘इंडियन आर्म्स अॅक्ट’ हा कायदा करून भारतियांना शस्त्रहीन केले, तर १९२० नंतर गांधींनी हिंदूंच्या मनातून शस्त्रे काढून घेतली. आजही अशाप्रकारे भारतियांना शौर्यहीन करण्यात शासनकर्त्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. महाभारतात म्हटले आहे, ‘शौर्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही.’ आमच्या प्रत्येक अवताराने शौर्याने लढाई करून कंस, चाणूर यांसारख्या समाजकंटकांना दूर केले. छत्रपती शिवरायांनी तर मावळ्यांना जागृत करून शौर्याने मोगलांच्या पाच पातशाह्या नष्ट केल्या. आजही संघर्षाला तोंड देण्यासाठी शौर्य जागरणाची आवश्यकता आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात