Menu Close

हिंदू पराक्रम विसरल्याने अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाले ! – अधिवक्ता श्री. प्रशांत यादव

पुणे येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये ९० हून अधिक राष्ट्रप्रेमींचा सहभाग

पुणे : अमरनाथ यात्रेवर आतंकवाद्यांनी आक्रमण केले; परंतु देशभरातील हिंदू समाज शांत आहे. आपला देश वीरपुरुषांचा असून आपण शौर्य जागवले पाहिजे. सद्यस्थितीत हिंदू हे छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे आणि अन्य राष्ट्रपुरुष यांचा पराक्रम विसरले, म्हणून अमरनाथ यात्रेवर आतंकवाद्यांनी आक्रमण केले. अमरनाथ यात्रा बंद पाडणे, हे पाकिस्तानचे भारतापासून काश्मीर तोडण्याचे षड्यंत्र आहे. त्या विरोधात बहुसंख्य हिंदूंनी एकत्र येऊन विरोध दर्शवायला हवा. त्यासाठी प्रत्येक घरातून केंद्र शासनाला ‘पाकिस्तानशी युद्ध करा’, अशी पत्रे गेली पाहिजेत. अमरनाथ यात्रेनंतर देशभरातील हिंदू रस्त्यावर उतरून पाकिस्तानशी युद्धाची मागणी करत आहे. राज्यकर्त्यांनी पुढच्या पिढीचा विचार करून पाकिस्तान नष्ट करावा. सध्या समाजात भयाण शांतता अनुभवायला येत असून आम्हांला शौर्य गाजवल्यावर येणारी शांतता हवी आहे, असे कणखर प्रतिपादन धर्माभिमानी अधिवक्ता श्री. प्रशांत यादव यांनी केले. येथील बाजीराव रस्त्यावर १३ जुलै या दिवशी आयेजित राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये ते बोलत होते. या वेळी नवयुग तरुण मंडळाचे श्री. बाळासाहेब धनवे, श्रीकृष्ण मंडळाचे श्री. जगदीश परदेशी, रा.स्व. संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री. किशोर पुरंदरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संदेश कदम आणि सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक यांसह ९० हून अधिक राष्ट्रप्रेमी आणि धर्माभिमानी उपस्थित होते. भर पावसातही आंदोलन उत्साहात आंदोलन पार पडले. ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे आंदोलनाचे थेट प्रसारण करण्यात आले. हे आंदोलन प्रत्यक्षपणे १० सहस्र ९३० हून अधिक जणांनी पाहिले, तर या आंदोलनाची लिंक ४९ सहस्र ४६८ लोकांपर्यंत पोचली.

हिंदू महिला, गाय आणि हिंदूंची आगामी पिढी वाचवायची असेल, तर हिंदु राष्ट्र स्थापणे आवश्यक ! – श्री. प्रवीण नाईक

काश्मीरमधून साडेचार लक्ष हिंदूंना विस्थापित केल्यावर धर्मांध काश्मीरमधील हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर घाला घालून ती नष्ट करू पहात आहेत. तेथील धर्मांध हे सैनिकांवर दगडफेक करतात आणि त्यानंतर तेथे उत्सव साजरा केला जातो, ही कश्मिरीयत आहे. अशाच प्रकारची कश्मिरीयत पश्चिजम बंगालमध्ये वाढत आहे. तेथेही धर्मांध हे हिंदूंवर अत्याचार करून कश्मिरीयत करत आहेत. ही परिस्थिती हिंदूंनी संघटितपणे आणि सनदशीर मार्गाने न रोखल्यास ती देशभर पसरेल. हिंदू महिला, गाय आणि हिंदूंची आगामी पिढी वाचवायची असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक आहे. हिंदूंनी स्वतःचे संरक्षण स्वतः करण्यासाठी स्वसंरक्षण शिकून सिद्ध व्हावे लागेल.

पश्चिम बंगाल येथील शासन बरखास्त करून लष्करी राजवट लागू करा ! – श्री. संदेश कदम

अमरनाथ यात्रेवरील आक्रमण हे पूर्वनियोजित होते. यापूर्वीही यात्रेवर आक्रमण झाले  असून त्याच वेळी धर्मांध आतंकवाद्यांना नेस्तनाबूत केले असते, तर ही वेळ पुन्हा आलीच नसती. दंगलीला कारणीभूत ठरवलेल्या सौरभ सरकारला सोडून दिले पाहिजे. बंगालमधील भीषण परिस्थिती लक्षात घेता केंद्रशासनाने बंगाल शासन बरखास्त करून लष्करी राजवट लागू करायला हवी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *