किती भारतीय हिंदु क्रिकेटपटूंनी हाशिम आमला सारखी कृती केली आहे ? – सम्पादक, हिन्दूजागृति
केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जगप्रसिद्ध क्रिकेटपटू हाशिम आमला याने त्याची मुलाखत घेणार्या एका भारतीय टीव्ही निवेदिकेला तिने घातलेले तोकडे कपडे पालटायला भाग पाडले.
एबीपी लाईव्ह या संकेतस्थळानुसार ३२ वर्षीय आमलाची एक भारतीय निवेदिका मुलाखत घेणार होती. या वेळी तिने अत्यंत तोकडे कपडे परिधान केले होते. यावर नाराज झालेल्या हाशिम आमलाने निवेदिकेचा पोशाख योग्य नसल्याचे सांगत मुलाखत देण्यास नकार दिला आणि स्वत:च्या काही अटी आयोजकांसमोर मांडल्या. यानंतर संबंधित निवेदिकेला कपडे बदलून येण्यास आयोजकांकडून सांगण्यात आले.
मुसलमान धर्माचा कट्टर अनुयायी असलेल्या हाशिम आमलाने याआधीही त्याच्या जर्सीवर कास्टल बीअरचे विज्ञापन झळकावण्यास नकार दिला होता. यासाठी तो ५०० डॉलर्स अर्थात ३४ सहस्र रुपयांचा दंड भरायलाही सिद्ध झाला होता.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात