Menu Close

ख्रिस्ती धर्मियांची वाढ होणार्‍या देशांत नेपाळ पहिल्या क्रमांकावर !

नेपाळची वेगाने ख्रिस्तीकरणाकडे वाटचाल !

काठमांडू : नवीन लोकशाही व्यवस्थेत एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये ख्रिस्ती धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. ख्रिस्ती धर्मियांची संख्या वेगाने वाढ होणार्‍या देशांमध्ये नेपाळ पहिल्या क्रमांकावर आहे, अशी माहिती ख्रिस्ती धर्माविषयी अभ्यास करणार्‍या एका संस्थेच्या अहवालानुसार समोर आली आहे.

१. नेपाळमध्ये वर्ष १९५१ मध्ये एकही ख्रिस्ती नव्हता. त्यानंतर वर्ष १९६१ मध्ये ख्रिस्त्यांची संख्या ४५८ एवढी झाली. वर्ष २००१ पर्यंत ही संख्या १ लक्ष २ सहस्र एवढी होती. आता १० वर्षांनंतर ही संख्या तिपटीने वाढली आहे. सध्या नेपाळमध्ये ३ लक्ष ७५ सहस्र ख्रिस्ती आहेत.

२. वर्ष १९५० पूर्वी विदेशींना नेपाळप्रवेश करण्यास बंदी होती. नंतर विदेशींना गिर्यारोहणाच्या नावाने अनुमती देण्यात आली आणि विदेशींना नेपाळमध्ये प्रवेश घेण्याची मुभा मिळाली.

३. वर्ष १९९० मध्ये माओवाद्यांनी नागरी युद्ध पुकारले आणि वर्ष २००८ मध्ये नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आली. एक हिंदु राष्ट्र असलेला हा देश आता साम्यवाद्यांचे वर्चस्व असलेला धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक बनला आहे. त्यामुळे धर्मांतराला सूट मिळाली आहे.

४. नेपाळमध्ये पावसाळ्यातील भुईछत्र्यांप्रमाणे चर्च निर्माण होत आहेत.

५. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे स्थिती अजून बिघडली आहे. भूकंपामुळे निर्माण झालेल्या बिकट स्थितीचा लाभ ख्रिस्ती मिशिनरी घेत आहेत. गरीब, भोळ्या हिंदूंना पैशाचे आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे.

६. एकेकाळी काठमांडू शहरापासून ५ मैलांवर असलेल्या दपच्या या गावात एकही ख्रिस्ती चर्च नव्हते. वर्ष २०११ मध्ये या गावात एक चर्च निर्माण झाले आणि आता केवळ १ सहस्र कुटुंबे असलेल्या या गावात ३ चर्च आहेत.

७. नेपाळमध्ये जातीवरून मोठ्या प्रमाणात भेदभाव केला जातो. याचा लाभ ख्रिस्ती मिशनरी घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *