Menu Close

‘अमरनाथ यात्रा थांबली, तर हज यात्राही थांबेल’, असे शासनाने सांगावे ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड

हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड

पुणे : कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अमरनाथ यात्रेवर झालेले आक्रमण हे संपूर्ण हिंदु समाजावर झालेले आहे. देशाची अखंडता तोडण्याचे हे षड्यंत्र असून केवळ अमरनाथ यात्रेवरच आक्रमण का होते ? हज यात्रेवर का नाही ? आज आमचे दुर्भाग्यच आहे की, कोणताही राजकीय नेता हिंदु धर्माचा रक्षणकर्ता नाही. अशा वेळी दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुष्कळ आठवण येते. वर्ष २००० मध्ये अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाले, त्या वेळी त्यांनी म्हटले होते की, अमरनाथ यात्रेवर आक्रमण कराल, तर हजसाठी मुंबईतून एकही विमान जाऊ देणार नाही. त्यानंतर पुढच्या अर्ध्याच घंट्यात सर्व परिस्थिती आटोक्यात आली होती. असे निर्भीडपणे बोलणारा हिंदूंचा वाघ आता कोणी नाही. विद्यमान मोदी शासनाला आमची मागणी आहे की, विकासासह देशाच्या सुरक्षेवरही लक्ष द्या. या घटनेत जे दोषी आहेत, त्यांना फाशी दिली गेली पाहिजे. मोदी शासनानेच असे सांगावे की, अमरनाथ यात्रा थांबली, तर हज यात्राही थांबेल. पंतप्रधान मोदी यांनी आता ‘मन की बात’ नाही, तर ‘गन की बात’ करावी. वन्दे मातरम् !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *