देवाला रिटायर करा अशी बाष्कळ बडबड करणार्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !
ऊठसूट हिंदु धर्मावर टीका-टिप्पणी करणार्यांना यावर काय म्हणायचे आहे ?
लंडन : २ फेब्रुवारीला युनायटेड किंगडममधील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स) एक सर्वेक्षण प्रसारित केले. यात आस्तिक आणि नास्तिक लोकांमधील सुखाच्या प्रमाणावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
१. सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, आस्तिक लोक हे नास्तिकांपेक्षा अधिक सुखी आहेत हे स्पष्ट झाले आहे.
२. विविध धर्मीय लोकांचा विचार केल्यास, हिंदु सर्वाधिक सुखी आहेत. सुखाच्या उतरत्या क्रमाने हिंदूंनंतर ख्रिस्ती, शीख, बौद्ध, ज्यू आणि शेवटी मुसलमान लोकांचा क्रमांक लागतो, तर नास्तिकांचा क्रमांक यानंतर लागतो.
३. हे सर्वेक्षण युनायटेड किंगडममधील तीन लाख लोकांचे विचार ध्यानात घेऊन केले गेले. वर्ष २०१२ ते २०१५ या तीन वर्षांच्या कालखंडात हे सर्वेक्षण करण्यात आले.
४. हे सर्वेक्षण सुख, जीवनाविषयी समाधान (लाइफ सॅटिस्फॅक्शन), केलेली कृती चांगली झाल्याविषयीची भावना (वर्थव्हाइल) आणि काळजी या चार निकषांच्या आधारे करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात