Menu Close

गोव्यात धार्मिक प्रतीकांच्या तोडफोडीच्या प्रकरणी फ्रान्सिस परेरा याला अटक

फ्रान्सिस परेरा याला अटक करून नेत असतांना पोलीस

मडगाव : गोव्यात गेले काही दिवस चालू असलेल्या धार्मिक प्रतीकांच्या तोडफोडीच्या प्रकरणी गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने १५ जुलै या दिवशी कुडचडे येथील फ्रान्सिस परेरा या पन्नाशीतील व्यक्तीला पकडले. फ्रान्सिस परेरा हा अविवाहित असून व्यवसायाने टॅक्सीचालक आहे. त्याचा बिलिव्हर्ससारख्या कट्टरपंथीय ख्रिस्ती संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. जुलै २०१७ मध्ये दक्षिण गोव्यात १२ धार्मिक स्थळांची तोडफोड करण्यात आली होती. या पार्श्व्भूमीवर राज्यात विशेष तपास पथक बनवून विशेषत: दक्षिण गोव्यात मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्यात आला होता.  कुडतरी येथे १४ जुलैच्या रात्री आणखी एक तोडफोड करण्याच्या प्रयत्नात असतांना परेरा याला गस्तीवरील पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी पाहिल्यानंतर परेरा याने त्याच्या चारचाकी वाहनात बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पडकले. त्याने ख्रिस्त्यांच्या धार्मिक स्थळांसह हिंदूंच्या अनेक धार्मिक स्थळांची तोडफोड केल्याचे मान्य केले आहे. वर्ष २००३ पासून गेली १४ वर्षे तो असले प्रकार करत होता. आतापर्यंत सुमारे १५० धार्मिक स्थळांची तोडफोड त्याने केली आहे. (ही आहे पोलिसांची कार्यक्षमता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘या धार्मिक स्थळांमध्ये वाईट आत्मे असतात आणि ते वाईट लोकांना शक्ती पुरवतात, म्हणून मी ही स्थळे तोडून त्या आत्म्यांना मुक्त केले. माझ्या कृत्याचा मला अजिबात पश्चाताप नाही’, असे आरोपीने पोलिसांसह पत्रकारांना सांगितले. पोलिसांच्या पथकाने परेरा याच्या घराची झडती घेऊन बरेच पुरावे गोळा केले आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर, स्थानिक आमदार नीलेश काब्राल, कुडचडे येथे दाखल झाले आणि त्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.

राजकीय षड्यंत्र असण्याच्या शक्यतेच्या दृष्टीने चौकशी होणे आवश्यक ! – मिकी पाशेको, माजी आमदार

पणजी : धार्मिक स्थळांच्या तोडफोडीमागे राजकीय षड्यंत्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दृष्टीकोनातून चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी माजी आमदार मिकी पाशेको यांनी केली आहे.

आरोपी हा आम आदमी पक्षाचा सक्रीय समर्थक ! – नीलेश काब्राल

धार्मिक स्थळांच्या तोडफोडीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी फ्रान्सिस परेरा हा आम आदमी पक्षाचा सक्रीय समर्थक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आरोपीने आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. यामुळे त्या दृष्टीनेही चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी भाजपचे कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी केली आहे.पोलीस पथकाला ५० सहस्र रुपयांचे बक्षीस  धार्मिक तोडफोडीच्या प्रकरणी आरोपीला पकडणाऱ्यां पोलीस पथकाला ५० सहस्र रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे आमदार नीलेश काब्राल यांनी शासनाच्या वतीने घोषित केले. (ही आहे जनतेच्या पैशाची उधळपट्टी ! ‘बक्षिस द्यायचेच आहे, तर स्वत:च्या पैशातून द्या’, असे राजकारण्यांना खडसवून सांगा ! १४ वर्षे गुन्हेगाराला न पकडणाऱ्यां पोलिसांकडून वेतनाचे पैसे वसूल करा आणि त्यांना कारागृहात टाका ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) 

हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बेछूट आरोप करणाऱ्यां काऊन्सिल ऑफ सोशल जस्टिस या ख्रिस्ती संघटनेला चपराक !

काऊन्सिल ऑफ सोशल जस्टिस या चर्चप्रणीत संघटनेच्या एका फॅक्ट फाईडिंग समितीने १४ जुलै या दिवशी तोडफोड झालेल्या ख्रिस्ती स्थळांची पाहणी केली होती आणि हा सुनियोजित पद्धतीने ख्रिस्त्यांची धार्मिक स्थळे तोडण्याचा प्रयत्न असल्याचा निष्कर्ष काढून यामागे अल्पसंख्यांकांना दबावाखाली ठेवण्याचा कट असल्याचे म्हटले होते. तसेच नुकत्याच रामनाथी येथे झालेल्या हिंदू अधिवेशनातील सहभागी संघटनांचा यात हात असण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते; मात्र या तोडफोडीच्या प्रकरणी १५ जुलै या दिवशी फ्रान्सिस परेरा याला अटक करण्यात आल्याने ख्रिस्त्यांची ही संघटना तोंडघशी पडली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *