केरळच्या काँग्रेसी राजवटीत शत्रूराष्ट्र पाकिस्तानचे गायक गुलाम अली यांचा उदोउदो होतो, तर हिंदूंच्या संतांवर आक्रमण केले जाते, हे लक्षात घ्या !
आलापुझा (केरळ) : आलापुझा जिल्ह्यातील आरूर शहरात सपर्या धर्म सेवा समितीच्या वतीने हैंदैवम् २०१६ कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारीला राज्यातील कोलाथूरच्या अद्वैत आश्रमाचे स्वामी चिदानंदपुरीजी महाराज प्रवचनातून हिंदूंना मार्गदर्शन करत होते. या वेळी डीवायएफ्आय (भारतीय लोकतांत्रिक नवयुवक सभा) या माकपप्रणीत संघटनेच्या ५० गुंड कार्यकर्त्यांनी स्वामीजींवर अचानक आक्रमण केले.
१. पंचायत सदस्य अधिवक्ता मनोज आरूर आणि ओ. रमेश यांच्या नेतृत्वाखाली हे आक्रमण करण्यात आले.
२. या वेळी सर्व कार्यकर्ते स्वामीजींच्या विरोेधात घोषणा देत सभागृहात दाखल झाले.
३. स्वामीजींविषयी अपशब्द काढत ते व्यासपिठाकडे धावले.
४. सतर्क झालेल्या हिंदूंनी तत्परतेने स्वामीजींच्या भोवती संरक्षक रिंगण निर्माण केले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
५. पोलिसांच्या साहाय्याने सर्व गुंडांना बाहेर काढण्यात आले.
६. या घटनाक्रमाचा केरळ भाजपने निषेध केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष कुम्मानम् राजशेखरन् म्हणाले की, स्वामी चिदानंदपुरीजी महाराज सनातन हिंदु धर्माच्या प्रचारासाठी अव्याहतरित्या कार्य करत आहेत; परंतु या घटनेमुळे मार्क्सवाद्यांनी हिंदु समाजाचाच अपमान केला आहे. मार्क्सवाद्यांना हिंदु संतांवर आक्रमण करून समाजात अराजक माजवायचे आहे.
७. कुम्मानम् यांनी केरळ शासनाकडे संबंधित हिंदुद्रोही मार्क्सवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात