मिरज : हिंदु जनजागृती समिती नि:स्वार्थीपणे करत असलेल्या कार्यामुळे समितीवर समाजाचा विश्वास आहे. समिती हिंदूंचे चांगल्या प्रकारे संघटन करत असल्याने समाजात निश्चित परिवर्तन घडू शकेल. समिती नेमके धर्मशास्त्र सांगत असल्यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीने आदर्श गणेशोत्सवाच्या संदर्भात विषय मांडावा, असे मत मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख श्री. तानाजीराव सातपुते यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीने गणेशोत्सवाच्या संदर्भात श्री. सातपुते यांची भेट घेतली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे, सर्वश्री गिरीश पुजारी, द्वारकाधीश मुंदडा उपस्थित होते.
गणेशोत्सव मंडळांना शास्त्रानुसारच उत्सव करण्याचे आवाहन करू ! – आेंकार शुक्ल, भाजप
मिरजेत गेली अनेक वर्षे चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा होतो. हा गणेशोत्सव आदर्श पद्धतीने, तसेच शास्त्रानुसार साजरा करण्याचे आवाहन आपण गणेशोत्सव मंडळांना करू. धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच व्हायला हवे, ज्या भाविकांना काही कारणांमुळे नदीवर जाणे शक्य नसेल त्यांच्यासाठी आपण विशेष व्यवस्थाही करू, असे भाजपचे सांस्कृतिक आघाडीचे प्रमुख श्री. आेंकार शुक्ल यांनी व्यक्त केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात