घाटकोपर
मुंबई : अमरनाथ यात्रेवरील आक्रमण आणि पश्चिम बंगालमध्ये धर्मांधांकडून सातत्याने होणारी हिंदूंवरील आक्रमणे यांचा १६ जुलै या दिवशी घाटकोपर रेल्वेस्थानकाच्या बाहेर राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे निषेध करण्यात आला. आंदोलनामध्ये स्वराज्य युवा प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू राष्ट्रसेना, शिवकार्य प्रतिष्ठान, शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती, हिंदू एकता जागृती समिती या संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. आंदोलन यशस्वी होण्यासाठी सर्वश्री गणेश मोदी, राहुल भुजबळ, महेश राजपूरकर, सुभाष अहिर, विवेक सावंत या स्थानिक धर्मप्रेमींनी पुढाकार घेतला.
मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार
१. हिंदूंच्या हिताचे काम न केल्यास पुढच्या निवडणुकीत भाजप शासनही पडल्याविना रहाणार नाही. – श्री. प्रकाश सावंत, हिंदु राष्ट्र सेना
२. चिनी वस्तूंवर संपूर्ण बंदी घालून आपण स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे. – श्री. प्रथमेश सुभेदार, धर्मप्रेमी
३. हिंदूंच्या यात्रेवरील आक्रमणे सहन केली जाणार नाहीत. यासाठी समस्त हिंदूंनी एकत्रित येऊन विरोध करण्याची आवश्यकता आहे. – कु. कावेरी मयेकर, धर्मप्रेमी
४. प्रत्येक हिंदूने कोणत्यातरी हिंदुत्वनिष्ठ संघटनेशी जोडले जाऊन हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात लढा देणे आवश्यक आहे. – श्री. ब्रिजेश शुक्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
क्षणचित्र
भर पावसातही आंदोलन करतांना कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून होता.
कल्याण
येथेही अमरनाथ यात्रेवरील आक्रमणाच्या विरोधात १६ जुलैला मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात हिंदु महामंडलम्, शंभुराजे युवा प्रतिष्ठान, हिंदु शक्ती वाहिनी, स्वराज्य मित्र मंडळ, बजरंग दल, लायन हार्ट ग्रुप, हिंदू राष्ट्र सेना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांसह भाजप, शिवसेना आणि मनसे यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बंगालचा बांगलादेश होण्याआधी राष्ट्रपती राजवट लागू करा ! – आधुनिक वैद्य उपेंद्र डहाके,
भाजप, कल्याण शहर उपाध्यक्ष एका विद्यार्थ्याने फेसबूकवर वादग्रस्त पोस्ट केल्याने सहस्रो धर्मांधांनी हिंदूंवर प्राणघातक आक्रमण करत हिंदूंची शेकडो घरे आणि मंदिरे उद्ध्वस्त केली, ३५ हिंदू घायाळ झाले, हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले. इतके होऊनही बंगाल शासन धर्मांधांच्या दाढ्या कुरवाळत सुस्त बसले आहे. त्यामुळे शासनाने बंगाल सरकार विसर्जित करावे आणि तेथे राष्ट्र्रपती राजवट लागू करून हिंदूंचे रक्षण करावे.
केवळ निषेध करून धन्यता मानण्यापेक्षा आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी सिद्ध व्हा ! – श्री. कैलास जाधव, हिंदु राष्ट्र सेना
आपण किती आणि कोणत्या गोष्टींचा निषेध करत रहाणार आहोत ? केवळ निषेध करून धन्यता मानण्यापेक्षा कृतीशील होऊन आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी सिद्ध व्हा. आम्हाला राजकीय पक्षांचे सरकार नको, तर हिंदूंचे राष्ट्र हवे आहे.
क्षणचित्रे
१. आंदोलनाचा विषय पटल्यावर येथील एका दुकानदाराने स्वत:हून शेजारील बऱ्यांच दुकानदारांच्या शासनाला देण्यात येणाऱ्यां निवेदनावर स्वाक्षऱ्यां घेऊन आपले धर्मकर्तव्य बजावले, तर स्वत: सनातन प्रभातच्या हिंदी मासिकाचा वर्गणीदार झाला.
२. मोर्चा मार्गक्रमण करतांना पोलिसांनीही वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवून सहकार्य केले. (मोर्चा आरंभल्यावर वाहतूक सुरळीत होण्यासाठी साधक प्रयत्नरत होते. तेथील अधिकाऱ्यांने ‘तुम्ही मोर्च्यात सहभागी व्हा. आम्ही वाहतूक सांभाळतो’, असे सांगितले.)
नागपूर
नागपूर : अमरनाथ यात्रेकरूंवरील आक्रमणाच्या निषेधार्थ येथे संविधान चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. अमरनाथ यात्रेवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा बीमोड करा, बंगालचा बांगलादेश होण्याआधी ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा, चिनी ड्रॅगनला रोखण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, तसेच साध्वी प्रज्ञासिंह यांना खोट्या आरोपाखाली ८ वर्षे कारागृहात डांबणारे आणि अनन्वित अत्याचार करणारे पोलीस अधिकारी, तसेच हे षड्यंत्र रचणारे राज्यकर्ते यांवर कारवाई करावी आणि नक्षलवादी कारवायांत गुंतलेल्या देहली विश्वविद्यालयाच्या प्रा. नंदिनी सुंदर आणि मानवाधिकार कार्यकर्त्या बेला भाटिया यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच आतंकवादाला खतपाणी घालणारा फरार आरोपी डॉ. झाकीर नाईक आणि त्याची बंदी घातलेली ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ ही संस्था यांचे ‘फेसबुक अकाऊंट’ त्वरित बंद करण्यात यावे, या मागण्याही या वेळी करण्यात आल्या.
आंदोलनाला योग वेदांत सेवा समिती, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक समिती, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था या संस्थांचे ४० कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात