तथाकथित धर्मनिरपेक्ष विचारसणीचा बळी ठरलेले श्रीपाल सबनीस
वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार हे अनेक संतांनीच सांगितलेले असल्यामुळे संतांच्या संकल्पाने ते स्थापन होणारच आहे, हे सबनीस यांनी जाणावे !
पुणे : आपल्या देशाला हिंदु राष्ट्र करण्याचे स्वप्न कुणी पहात असेल, तर ते भंगणारे स्वप्न ठरेल. हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि धर्मनिरपेक्षच राहील. धर्म, जात, लिंगभेद, तसेच भाकरीचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले, तरच आपण मिळवलेल्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ गवसेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे मांडले. (हिंदु राष्ट्र धर्माधिष्ठित असल्याने ते मूलतःच भेद न मानणारे असते. तिथे प्रत्येकाला योग्य तो न्याय मिळतो. त्यामुळे स्वातंत्र्याचा खरा अर्थ गवसायचा असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे ! – संपादक) काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने अनंत गाडगीळ यांच्या हस्ते सबनीस यांना काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार ६ फेब्रुवारीला देण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
(म्हणे) समीर गायकवाड हा बहुजनातील नथुराम आहे !
श्रीपाल सबनीस यांची वैचारिक विकृती !
आंतरराष्ट्रीय आतंकवाद मोडून काढून मानवतेची जोपासना हाच प्राधान्यक्रम असला पाहिजे. संपूर्ण गांधीवाद काँग्रेसने कधीच स्वीकारला नाही. देशाचा भूगोल आणि इतिहास पादाक्रांत करत गांधीच जगभर पोचले. गांधींची हत्या करणारा नथुराम पुण्यात जन्माला यावा, हे दुर्दैव आहे. पूर्वीचा नथुराम ब्राह्मण होता, आता समीर गायकवाड हा बहुजनांतला नथुराम आहे. (समीर गायकवाड यांच्या विरोधात अद्यापपर्यंत कोणताही पुरावा सापडलेला नसतांना त्यांना नाहक खुनी ठरवण्याचा प्रयत्न करणारे सबनीस यांच्यासारखे जात्यंध साहित्यिक कशाप्रकारचे साहित्य लिहीत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक) असहिष्णुता केवळ एखाद्या धर्मापुरती वा पक्षापुरती मर्यादित नाही. हिंदु आणि मुसलमान धर्मियांचा उन्माद, अल्पसंख्यांकांचे अवाजवी लाड, शाहबानो प्रकरण, आणीबाणी, शिखांचे हत्याकांड, गोध्रा प्रकरण ही काँग्रेस-भाजप यांची, तर नंदीग्राम आंदोलन हे डाव्यांच्या असहिष्णुतेचे उदाहरण आहे. एका जातीचा जातीयवाद हा दुसर्या जातीयवादाला उत्तर ठरू शकत नाही, अशी वैचारिक दिवाळखोरी दर्शवणारी विधाने सबनीस यांनी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात