असे निवेदन का द्यावे लागते ? शासन स्वतःहून पुढाकार घेऊन अशा घटनांना आळा का घालत नाही ?
पुणे : स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन या दिवशी प्लास्टिकच्या, तसेच कागदी ध्वजांच्या वापरामुळे राष्ट्रध्वजाची विटंबना होते. याविषयी हिंदु जनजागृती समिती गेली १४ वर्षे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा ! ही चळवळ राबवत आहे. या चळवळीचे यश म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घातली आणि तसा कायदाही करण्यात आला आहे. या कायद्याचे कठोरपणे पालन व्हावे आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. हेमंत निकम यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी दिले. या वेळी समितीचे सर्वश्री कृष्णाजी पाटील आणि महेश पाठक उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
समितीचे कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी तहसीलदार नंदा परदेशी यांना निवेदन द्यायला गेले होते. परदेशी स्वतः समितीच्या कार्यकर्त्यांना श्री. हेमंत निकम यांच्याकडे घेऊन गेल्या आणि समिती करत असलेल्या अनेक सामाजिक कृतींच्या पाठपुराव्यासंबंधी आपणहून सांगितले. त्यानंतर त्यांनी समितीचे कौतुकही केले.
अमरनाथ यात्रेवरील आक्रमणाच्या निषेधाचे निवेदन सादर
१० जुलै या दिवशी अमरनाथ यात्रेवर झालेल्या आक्रमणाचा निषेध म्हणून येथील बाजीराव रस्त्यावर १३ जुलैला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले होते. त्याविषयीचे निवेदनही श्री. हेमंत निकम यांना समितीच्या कार्यकर्त्यांनी दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात