जळगाव : राष्ट्र आणि धर्म रक्षण, तसेच सामाजिक दुष्प्रवृत्ती यांविरोधात जळगाव शहरासह जिल्ह्यात कुठेही काही साहाय्य लागल्यास आम्ही संपूर्णपणे योगदान देण्यास सिद्ध आहोत, असा निर्धार येथील अधिवक्त्यांनी व्यक्त केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे अधिवक्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. समाजात विधी साक्षरता मार्गदर्शनांचे आयोजन करणे, माहिती अधिकार शिबिरे आयोजित करणे, हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर साहाय्य करणे अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा होऊन नियोजन झाले. बैठकीला समितीच्या वतीने श्री. प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले, तर बैठकीचे संपूर्ण आयोजन सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला आलेले अधिवक्ता निरंजन चौधरी आणि अधिवक्ता गोविंद तिवारी यांनी केले.
क्षणचित्रे
१. ११ अधिवक्ते हे २५ ते ३५ या वयोगटातील होते. युवा अधिवक्त्यांचा राष्ट्र-धर्म कार्याप्रती उत्साह चांगला होता.
२. एक अधिवक्ते मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत होते.
३. अधिवक्त्यांनी साधना आणि नामजप यांविषयीही जिज्ञासेने समजून घेतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात