-
हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळ
-
२८ जुलैला कृती समितीच्या बैठकीचे आयोजन
जळगाव : १५ ऑगस्टला असलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. जनजागृतीसाठी सिद्ध केलेली एक चित्रफीतही या वेळी दाखवली. निवेदन देतांना सर्वश्री सचिन वैद्य, मयुर भदाणे, भावेंद्र भावसार आणि प्रणव नागणे उपस्थित होते.
जळगाव येथे राज्य शासनाच्या निर्देशानुसार ‘कृती समिती’ स्थापन करण्यात आली आहे. त्यात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचाही सहभाग आहे. गेली अनेक वर्षे कृती समितीची बैठक स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन यांच्या काही दिवस अगोदर घेतली जात असल्याने अपेक्षित फलनिष्पत्ती मिळत नाही, अशी अडचण समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे मांडली. जिल्हाधिकार्यांनी तत्परतेने त्याची नोंद घेत २८ जुलैला सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन केले. (राष्ट्ररक्षणासाठी तत्परता दाखवणार्या जिल्हाधिकार्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात