-
हिंदूंची मंदिरे ‘मनोरुग्ण’च कशी तोडतात ? कि धर्मभ्रष्टांना जाणीवपूर्वक मनोरुग्ण ठरवले जाते ?
-
मंदिरातील मूर्तीची तोडफोड करणार्याला पोलिसांनी मनोरुग्ण ठरवले !
मंदिरात तोडफोड करणार्यांना कठोर शिक्षा केल्यास अशा घटना वारंवार घडणार नाहीत ! धर्मांधांकडून हिंदूंच्या श्रद्धास्थानांची जाणीवपूर्वक विटंबना करून नियोजनपूर्वक दंगली भडकवण्याचे कारस्थान केले जाते, हे पुन्हा एकदा समोर आले ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
हजारीबाग (झारखंड) : विष्णुगड पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील बनासो येथे धर्मांधांकडून प्राचीन महामाया बागेश्वरी मंदिर परिसरातील द्वारपाल मूर्तीची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दुकानांची तोडफोड केली आणि रस्ता बंद केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. या कालावधीत पोलिसांकडून ध्वजसंचलन करण्यात आले, तसेच लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. गावात मोठ्या संख्येने पोलीस दलाला पाचारण करण्यात आले असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उपस्थितांनी सांगितल्यानुसार मंदिरातील पहारेकर्याने मूर्तीची तोडफोड करणार्यांपैकी एका युवकाला पकडले, तर इतर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पहारेकर्याने या घटनेची माहिती लोकांना दिली. त्यानंतर संतप्त जमावाने एका टपरीला आग लावली, तसेच ४ दुकानांची तोडफोड केली. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग १०० बंद केला. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराचे गोळे सोडले आणि हवेत गोळीबार केला. बनासो येथे लोकांनी पोलिसांवर तुरळक दगडफेकही केली. घटनेनंतर अल्पसंख्यांकबहुल नवादा गावात मोठ्या प्रमाणात जमाव एकत्र आला होता. पोलिसांनी त्यांना पिटाळून लावले.
मंदिरातील तोडफोडीविषयी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी युवकाला अटक करून पोलीस ठाण्यात नेले. प्राथमिक तपासणीनंतर याविषयी पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, आरोपी युवकाचे मानसिक संतुलन बिघडले आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात