Menu Close

अमरनाथ यात्रेवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा बीमोड करा ! – हिंदु जनजागृती समिती

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. त्रिगुण कुलकर्णी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

सांगली : श्री अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवूनही १० जुलै २०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेकरूंवर आतंकवादी आक्रमण होऊन ७ जण ठार, तर १९ जण घायाळ झाले. ही घटना गंभीर आणि चिंताजनक आहे. दोन वर्षांपूर्वीही आतंकवाद्यांनी आक्रमण करून लंगरची जाळपोळ केली होती आणि २४ जण घायाळ झाले होते. या सर्व कारवाया पाकिस्तानपुरस्कृत आहेत, हे आता स्पष्ट होत आहे. तरी अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण करण्याचे धाडस पुन्हा कोणीही करणार नाही, असा धडा पाकिस्तान आणि काश्मीरमधील आतंकवादी यांंना शिकवावा, तसेच पाकिस्तानचा ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’ हा दर्जा काढून घ्यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. त्रिगुण कुलकर्णी यांना १९ जुलै या दिवशी देण्यात आले.  या वेळी सर्वश्री संतोष देसाई, गोरखनाथ लिमकर, नारायण मेणकर, सौ. सुजाता कुलकणी, सौ. संगीता लिमकर उपस्थित होत्या.
या वेळी करण्यात आलेल्या अन्य मागण्या…

१. भारतियांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा, स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा, तसेच भारत सरकारने चीनशी असलेल्या व्यापारविषयक धोरणावर पुनर्विचार करून चीनची आर्थिक नाकेबंदी करावी.

२. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *