Menu Close

‘कौन्सिल फॉर सोशल जस्टीस अ‍ॅन्ड पीस’ आणि ‘दक्षिणायन’ यांनी हिंदूंची क्षमा मागावी ! – हिंदु जनजागृती समिती

‘इन्क्विझिशन’ची मानसिकता जोपासणार्‍यांंचे गोव्यातील हिंदू अधिवेशन बंद पाडण्याचे षडयंत्र ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पणजी : मागील १४ वर्षांपासून हिंदु देवतांच्या मूर्ती, तुळशी वृंदावने आणि ख्रिस्त्यांचे क्रॉस यांची तोडफोड केल्याप्रकरणी फ्रान्सिस्को परेरा या ख्रिस्ती व्यक्तीला पोलिसांनी रंगेहात पकडून पुरावे मिळवल्यानंतरही गोव्यातील चर्चशी संबंधित संस्था आणि दक्षिणायनसारख्या पुरोगामी संस्था यांनी नेहमीचे रडगाणे गात हिंदुत्वनिष्ठांना दोष देणे चालूच ठेवले आहे. पोर्तुगीज राजवटीतील ‘इन्क्विझिशन’च्या काळात ज्याप्रमाणे हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस केला जात होता, त्याच विकृत मानसिकतेत असणार्‍या परेराने मागील १४ वर्षांत कोणकोणत्या धार्मिक स्थळांची कशी तोडफोड केली, हे प्रात्यक्षिकांसह पोलिसांना दाखवून दिले आहे. हिंदूंवर अत्याचार करणार्‍या ‘इन्क्विझिशन’विषयी आजवर माफी न मागणार्‍या गोव्यातील चर्चने आतातरी पुढाकार घेऊन हिंदूंची मंदिरे आणि घुमट्या पाडणार्‍या ख्रिस्ती परेराच्या कृत्याविषयी हिंदु समाजाची माफी मागितली पाहिजे; मात्र प्रत्यक्षात ‘चोराच्या उलट्या बोंबा’ चालू असून ‘शांती’च्या नावे कार्यरत चर्च संस्था आणि ‘दक्षिणायन’सारख्या पुरोगामी संघटना यांनी या प्रकरणाला अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक असा रंग देऊन गोव्यातील धार्मिक सलोखा आणखी बिघडवण्याची मोहीम व्यापक केली आहे. या संघटनांचे खरे स्वरूप उघड झाले असून त्यांची खरी पोटदुखी गोव्यात होणार्‍या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामुळे आहे, हे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळेच ते अवघ्या १ महिन्यापूर्वी झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील ‘बीफ’च्या वक्तव्याचा संबंध १४ वर्षांपासून मूर्ती आणि क्रॉस तोडणार्‍या परेराच्या कृत्याशी जोडण्याचे अजब कार्य करत आहेत. त्यामुळे अशांनी आता गोमंतकीय हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य प्रवक्ता डॉ. मनोज सोलंकी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

फ्रान्सिस्को परेरा स्वत:हून मागील १४ वर्षांतील स्वत:चे कारनामे पुराव्यांसह पोलिसांना दाखवत असतांना मूर्तीभंजनासाठी हिंदू अधिवेशन आणि साध्वींची कथित वक्तव्ये यांना उत्तरदायी धरण्याचा चर्च संस्था आणि पुरोगामी यांचा दुर्दैवी प्रयत्न चालू आहे. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, गोव्यात होणारे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन मागील सहा वर्षांपासून होत आहे आणि साध्वी सरस्वती या याच वर्षी प्रथम गोव्यात आल्या होत्या. तसेच साध्वींवर खोटेनाटे आरोप करणार्‍यांनी हे दाखवून द्यावे की, त्यांच्या कथित वक्तव्यानंतर गोव्यात ‘बीफ’ खाणार्‍यांवर किती आक्रमणे झाली किंवा किती जणांना रस्त्यावर फाशी देण्यात आले ? साध्वींच्या केवळ एका वक्तव्यावरून एवढा गदारोळ करणारे, फ्रान्सिस्को परेरा मागील १४ वर्षांपासून मूर्तीभंजन करत आहे, बहुसंख्यांकांची मंदिरे पाडत आहे, तुळशी वृंदावने तोडत आहे, याकडे मात्र दुर्लक्ष करत आहेत. इतकेच नव्हे तर त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वत:चे धार्मिक हेतू साध्य करण्यासाठी अशा अट्टल गुन्हेगाराला पाठीशी घालण्याइतपत चर्च संस्थेचे नैतिक अध:पतन झाले, हे लाजिरवाणे आहे. चर्च संस्थेच्या अशा विद्वेषी भूमिकेविषयी सरकारने केवळ इशारे न देता त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी आहे. तसेच हा तपास केवळ फ्रान्सिस्को परेरापर्यंतच मर्यादित न ठेवता त्याचा सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *