कावेबाज धर्मांध !
मंगळुरू : मंगळुरू शहरातील सुरतकल उपनगरात कुप्पपेवाड्यातील अबूबकर सिद्दीकी (वय ३० वर्षे) या युवकाने १० जुलै या दिवशी त्याच्यावर जमावाने आक्रमण केल्याचा दावा केला होता. त्यात त्याच्या डोक्यावर ब्लेडने जखम झाल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामागे अबूबकर याने तो धार्मिक हिंसाचाराचा बळी म्हणून पडल्याचे ढोंग केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
पोलिसांनी दिलेल्या निवेदनात अबूबकर याने दावा केला होता की, दुचाकीवर बसलेल्या काही लोकांनी सायंकाळी ७ वाजता त्यांच्यावर आक्रमण केल्यानंतर ते पळून गेले होते. त्याने तक्रार प्रविष्ट करण्यासाठी बाजीपेठ पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना जखम दाखवल्यावर त्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात नेले. चौकशीच्या वेळी पोलिसांना असे आढळले की, अबूबकरने घटनास्थळाविषयी उलटसुलट तपशील दिला. पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवल्यावर त्याने मान्य केले की, त्याने स्वतःच दुखापत करून घेतली आहे. (या घटनेवरून गोरक्षकांकडून मारहाण करण्यात आल्याचेही सोंग धर्मांध रचत असतील, अशीच शंका येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात