रियाध : सध्या सोशल साईटवर एका व्हिडिओने खळबळ उडवून टाकली आहे. सौदी अरेबिया सारख्या कट्टर मुस्लिम देशात महिलांसाठी अनेक कडक नियम आहेत. पण खुलूद नावाच्या एका सौदी तरुणीने हे सर्व नियम मोडून एक शूट केले आहे. यात ती मिनी स्कर्ट घालून सैर करत असल्याचे दिसत आहे. तिचे हे वागणे बेताल असून सौदीच्या नियमांविरोधात आहे. यामुळे या तरुणीला कडक शिक्षा देण्यात येणार आहे.
तरुणीची चौकशी सुरू असून तिला कोणती शिक्षा द्यायची यावर चर्चाही होत आहेत. अनेकांनी व्यक्तीस्वातंत्र्य असल्याचे सांगत तिचे समर्थन केले आहे. तर काही जणांनी तिच्यावर कडाडून टीका केली आहे. सौदी अरेबियात महिलांसाठी काही कडक नियम आहेत. महिलांच्या आचरणापासून ते त्यांच्या पोषाखापर्यंत निरनिराळे नियम बनवण्यात आले आहेत. महिलांना अंगभर कपडे घालणे, बुरखा घालणे, डोके झाकणे सक्तीचे आहे. फक्त बाहेरुन येणाऱ्या महिलांना हे नियम लागू नाहीत.
सौदीमध्ये नियम तोडणाऱ्याला भर रस्त्यात कडक शिक्षा देण्यात येते. जेणेकरुन दुसरा कोणी नियम तोडण्यास धजावणार नाही.
स्त्रोत : सामना