Menu Close

सनी लिओन यांच्या संकेतस्थळावर बंदी घालण्याची रणरागिणी शाखेची गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी

डावीकडून श्री. हंसराज अहिर, सौ. माला कुमार आणि कु. टुपुर भट्टाचार्य

देहली : हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहिर यांची भेट घेतली. सनी लिऑन या अश्‍लील चित्रपटात काम करणार्‍या अभिनेत्रीने भारतात अवैधरित्या संकेतस्थळ चालू ठेवले आहे. सनी लिऑन ही स्त्रीजातीसाठी कलंकच आहे, अशी भावना रणरागिणी शाखेच्या देहली येथील सौ. माला कुमार आणि कु. टुपुर भट्टाचार्य यांनी मंत्रीमहोदयांकडे व्यक्त केली.

सनी लिऑनच्या विरोधात अश्‍लीलता पसरवल्याविषयी ठाणे जिल्ह्यात गुन्हा नोंदवण्यात येऊनही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे या वेळी गृराज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सनी लिऑन या संकेतस्थळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहे.

या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्यात यावी, या व्यवहारात गुन्हेगारी संबंध आहेत का ?, हेदेखील तपासावे आणि तिला या अवैध कार्यात साहाय्य करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आणि सर्व पुराव्यांसह सरकारकडे करण्यात आली आहे. ‘या प्रकारणी गांभीर्याने लक्ष घालू’, असे आश्‍वासन श्री. हंसराज अहिर यांनी दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *