Menu Close

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या कणखर नेत्याची आज भारताला आवश्यकता ! – सचिन खैरे, शिवसेना

संभाजीनगर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात १२५ हून अधिक हिंदु धर्माभिमान्यांची उपस्थिती

संभाजीनगर : हिंदु जनजागृती समिती नेहमीच हिंदूंसाठी लढते, हिंदूंवर होणार्‍या प्रत्येक आक्रमणाच्या विरोधात आवाज उठवण्याचे कार्यही ती करते. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे असतांना अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा त्यांनी ठणकावून सांगितले की, मुंबईहून एकही विमान हज यात्रेसाठी उडू देणार नाही. आज बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या कणखर नेत्याचीच भारताला आवश्यकता आहे. अमरनाथ यात्रेवर झालेल्या आक्रमणाला उत्तरदायी असलेल्या पी.डी.पी सरकारचा आम्ही निषेध करतो, तसेच पश्‍चिम बंगाल येथे हिंदूंना पुरेशी सुरक्षा न पुरवणार्‍या ममता सरकारचाही आम्ही निषेध करतो, असे मत शिवसेना नगरसेवक श्री. सचिन खैरे यांनी व्यक्त केले. ते पैठण गेट येथील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ १९ जुलै या दिवशी झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. या आंदोलनात १२५ हून अधिक हिंदू धर्माभिमानी सहभागी झाले होते.

केंद्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना भाविक आणि सैनिक मारले जाणे दुर्दैवी ! – ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, राष्ट्रीय वारकरी सेनेचे संघटक

१. निष्फळ ठरलेली राज्यव्यवस्था पालटून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हे आमचे सर्वांचे धर्मकर्तव्य आहे.

२. सातत्याने हिंदूंच्या हत्या, तसेच त्यांच्यावर आघात होत आहेत. या आघातांमध्ये सर्वाधिक जिवीत आणि आर्थिक हानी हिंदूंचीच होत आहे.

३. केंद्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना भाविक आणि सैनिक मारले जाणे दुर्दैवी आहे.

४. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श सांगतो; मात्र त्यांनी त्यांच्या प्रजेला आणि सैन्याला अधिक महत्त्व दिले, त्याप्रमाणे सध्याची राज्यव्यवस्था त्यांचे कर्तव्य पार पाडू शकत नाही.

५. मी राज्यकर्त्यांना प्रश्‍न करतो, तसेच भीष्माचार्य निवृत्ती महाराज नेहमी सांगतात की, ज्याला खासदार म्हणून निवडून द्यायचे आहे, त्याच्या भावाला हातात बंदूक घेऊन देशाचा सीमेवर पाकिस्तानशी लढायला पाठवायला हवे, मग कळेल सैन्य मेल्यावर आणि जीवित हानी झाल्यावर काय दुःख होते !

६. राष्ट्र्रीय वारकरी सेना, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या माध्यमातून धर्मजागृती आणि हिंदु राष्ट्राच्या यज्ञकुंडात आपण सहभागी व्हावे.

७. जे धर्मांध हिंदूंचे रक्त सांडत आहेत, त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे.

ममता सरकार आणि जम्मूमधील पीडीपी सरकार बरखास्त करावे ! – श्री. प्रवीण नाईक, सनातन संस्था

हिंदूंच्या मानवाधिकारांचे संरक्षण करण्यात असमर्थ ठरलेले ममता सरकार आणि जम्मूमधील पीडीपी सरकार तात्काळ बरखास्त करावे. तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहेत.

पश्‍चिम बंगालमध्ये हिंदूंवर झालेल्या आक्रमणाच्या निषेधासाठी आंदोलन ! – कु. प्रतीक्षा कोरगांवकर

मी सर्वांना आवाहन करते की, आपण चिनी वस्तूंवर आजपासून बहिष्कार घालूया. चिनी वस्तू आजपासून खरेदी करणार नाही, असा निश्‍चय प्रत्येकाने करूया. पश्‍चिम बंगालमधील चोवीस परगणा भागात धर्मांधांनी क्षुल्लक कारण काढून अनेक हिंदूंवर आक्रमण केले. या घटनेचा निषेध करण्यासाठी संभाजीनगर येथील समस्त धर्मप्रेमी नागरिक आज रस्त्यावर उतरले आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही याचा निषेध करत आहेत.

काश्मीरमधील सरकार विसर्जित करून काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी ! – अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, हिंदु विधीज्ञ परिषद

१. ८५ टक्के हिंदूंनी मोठ्या अपेक्षेने मोदी सरकारला निवडून दिले; परंतु गेली ३ वर्षे हिंंदूंवरील अत्याचारात घट होतांना दिसत नाही.

२. अमरनाथ यात्रेवरील आक्रमण म्हणजे खर्‍या अर्थाने हिंदूंच्या रूढी, परंपरा आणि संस्कृती यांवर केलेले आक्रमणच आहे. याला जम्मू-काश्मीरचे शासनही तितकेच उत्तरदायी आहे.

३. आज चीनची आक्रमकता दिवसेंदिवस वाढत आहे. भारताचा एकेक भूभाग चीन बळकावत असतांना आपण चिनी वस्तूंचा वापर करणे अयोग्य आहे. यासाठी आपण चिनी मालावर बंदी घातलीच पाहिजे.

क्षणचित्रे

१. अनेक मुसलमान तरुणांचे गट एकत्र येऊन आंदोलनाचे निरीक्षण करत होते.

२. आंदोलनात मोठ्या संख्येने लहान मुले, महिला आणि तरुण वर्ग सहभागी होता.

३. एक पूर्ण कुटुंब, तसेच तरुणांचा गट आंदोलनात येऊन सहभागी झाले.

४. चिनी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी विचारल्यावर सर्वांनी उत्स्फूर्तपणे होकार दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *