Menu Close

आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍या देशांच्या सूचीमध्ये पाकिस्तान ! – कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने प्रकाशित केलेल्या ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम’ या अहवालात पाकिस्तानचा समावेश आतंकवाद्यांच्या आश्रयदात्या देशांच्या सूचीमध्ये करण्यात आला आहे. (पाक गेली काही दशके आतंकवाद्यांना आश्रय देण्याबरोबर त्यांची निर्मितीही करत आहे आणि हे अमेरिकेलाही माहीत आहे; मात्र आता अमेरिकेला त्याची जाणीव होत आहे ! केवळ अशा सूचीमध्ये नाव घालून पाकमधील आतंकवाद नष्ट होणार नाही. त्यासाठी त्यांच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्यकता आहे. अमेरिका खरोखरच अशी कृती करील तेव्हाच ती आतंकवाद संपवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे, हे जगाला समजेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पाकिस्तान आतंकवाद्यांसाठी नंदनवन ठरत आहे, असे यात म्हटले आहे. आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍या देशांच्या सूचीमध्ये पाकसह अफगाणिस्तान, सोमालिया, दक्षिण फिलिपिन्स, इजिप्त, इराक, लेबेनॉन, लिबिया, येमेन, कोलंबिया आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे.

१. २०१६ मध्ये पाकमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद या २ आतंकवादी संघटनांनी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण शिबिरे चालवली, तसेच विविध मार्गानी निधीसंकलनही केले. याकडे पाकच्या सरकारने सोयिस्करपणे दुर्लक्ष केले. तसेच पाकने अफगाण तालिबान किंवा हक्कानी गटाविरोधात परिणामकारक कारवाई करण्यास टाळाटाळ केली, असे या अहवालात म्हटले आहे.

२. पाकने लष्कर-ए-तोयबावर बंदी घातली असली, तरी जमात-उद-दवा आणि फलाह-इ-इन्सानियत फाऊंडेशन या संस्थांच्या माध्यमातून ही आतंकवादी संघटना  निधीसंकलनाचा उपक्रम राबवत आहे. लष्कर आणि जैश या दोन्ही संघटनांनी भारतविरोधी कारवाया चालूच ठेवल्या आहे. २०१६ मध्ये पठाणकोट आणि उरी या ठिकाणी करण्यात आलेल्या आतंकवादी आक्रमणांत या संघटनांचा सहभाग होता, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

३. भारताने वारंवार पुरावे सादर करूनही पाकिस्तान सरकारने या संघटनांना मोकळे रान दिले. पाक सैन्याने तेहरीक-ए-तालिबानसारख्या संघटनांवर कारवाई केली; परंतु त्याला मर्यादित स्वरूप होते. अल कायदा, इसिस, जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा आणि दाऊद इब्राहिम यांच्या विरोधात संयुक्तपणे लढा देण्याचा भारत आणि अमेरिकेचा निर्धार आहे. त्यासाठी अमेरिका सर्वतोपरी सहकार्य करण्यास सिद्ध आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *