Menu Close

अतिक्रमणाच्या नावाखाली पाडलेल्या श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामास लवकरच आरंभ करणार – किशोर राजे निंबाळकर

जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर प्रशासन नरमले !

जळगाव : शहरातील अजिंठा चौकातील श्रीकृष्ण मंदिराची संरक्षक भिंत चौक सुशोभिकरणाच्या आड येत असल्याचे कारण देऊन १९ जुलैच्या रात्री पाडण्यात आली. यासंदर्भात मंदिराची देखभाल करणार्‍यांना पूर्वकल्पना दिली नव्हती. त्यामुळे प्रशासनाने विश्‍वासघात केल्याचा आरोप स्थानिक भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी केला. या पार्श्‍वभूमीवर आमदार भोळे, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच जळगावमधील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला आणि मंदिराची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी केली. या वेळी आजच सर्व आवश्यक साहित्याची सिद्धता करून लवकरच पाडलेल्या श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामास आरंभ करण्यात येईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

१. जळगाव महानगरपालिकेचे महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर, आमदार श्री. राजूमामा भोळे यांच्या बैठकीत मंदिर पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (हिंदूंची मंदिरे पाडणारे प्रशासन शहरात वाहतुकीला अडथळा ठरणारी मशीद, तसेच मशिदींवरील अनधिकृत भोंगे यांच्यावर कधी कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्या ! संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. सुशोभीकरणासाठी १४ वृक्ष तोडण्यात आले. (सुशोभिकरणाच्या नावाखाली पर्यावरणाचा श्‍वास असणारे वृक्ष नष्ट करणारे प्रशासन म्हणे ३ कोटी वृक्ष जतन करणार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. मंदिराची पुनर्बांधणी करण्याचे आश्‍वासन दिले असले, तरी पूर्वकल्पना न देता मंदिर पाडणे, हा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचाच प्रकार आहे. तसेच वृक्षतोडही पर्यावरणाची हानी करणारी आहे. त्यामुळे संबंधितांवर उचित कारवाई व्हावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *