Menu Close

हिंदू पंचांगाला खगोल शास्त्रीय आधार यावर ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ डाॅ. नितीन घाटपांडे यांचे मार्गदर्शन

अमरावती : तंत्रज्ञान अन् संशोधनाद्वारे अवकाश, खगोलीय क्षेत्रात विज्ञानाने झेप घेतली. मात्र आजही ग्रह, तारे, नक्षत्रांच्या मानवी जीवनावर होणारे परिणाम तसेच भविष्यातील घडामोडी जाणण्याचे प्रयत्न संशोधन सुरू आहे. या सर्वांचे उत्तर हजारो वर्षांपूर्वीच भारतीय साधू, संत, महर्षींनी ज्ञानातून समाजाला दिले. पंचांगानुसार अवकाश क्षेत्रातील ग्रह ताऱ्यांची स्थिती, गती, नक्षत्र ग्रहणाद्वारे होणाऱ्या घडामोडीवर शास्त्रशुद्ध माहिती मिळवता येते. नेमके हे कसे घडते ?, पंचांग म्हणजे काय ?, ब्रह्मांड म्हणजे काय ?, जीवन, ब्रम्हांडाचा संबंध काय ? अशा जिज्ञासू प्रश्नांवर मार्गदर्शन हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील हिंदू पंचांगाला खगोल शास्त्रीय आधार यावर बाेलताना इस्रोचे ब्रह्मप्रकाश वैज्ञानिक डाॅ. नितीन घाटपांडे यांनी केले.

त्यांनी कालगणना पद्धती, सूर्य-चंद्र अंतर, १२ राशींचे चक्र, तिथी नक्षत्र ठरवण्याची पद्धत, १२ राशींचे चक्र, तिथी नक्षत्र ठरवण्याची पद्धत यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. चांद्र मंगळयान या यशस्वी मोहिमांमध्ये डाॅ. घाटपांडे यांचे योगदान आहे. अवकाशयान मोहिम यशस्वी होण्यासाठी ग्रहांची स्थिती, कक्षांचा वेळेनुसार अभ्यास आवश्यक असतो. अतिप्रगत तंत्रज्ञानावर आधारीत अवकाश मोहिमांच्या वेळेचे गणित भारतीय पंचांगानुसार शास्त्रीय आधारावर तंतोतंत जुळले आहे. भारतीय पंचांगाच्या शास्त्रीय अंतराळ मोहिमांची पायाभूत तयारी याचे अभ्यासक डाॅ. घाटपांडे आहेत. त्यांनी याप्रसंगी हिंदू पंचांगाला खगोल शास्त्रीय आधार कशाप्रकारे आहे, यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी एचव्हीपीएम प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, सचिव डाॅ. माधुरी चेंडके, अभियांत्रिकीचे संचालक डाॅ. श्रीकांत चेंडके, प्राचार्य डाॅ. ए. बी. मराठे उपस्थित होते.

तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन

हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील तंत्रज्ञान महोत्सवांतर्गत परम शावक संगणक, थ्रीडी प्रिंटर, आयओटी अद्ययावत प्रयोग शाळेचा शुभारंभ करण्यात आला. २२ जुलै रोजी महाविद्यालयात व्हिजिनींग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना नियोजित अभियांत्रिकी अभ्यासक्रमासोबतच भविष्यातील तंत्रज्ञानाची माहिती प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मायक्रोसॉफ्टचे मंदार कुळकर्णी, एक्सेंजर कंपनीचे नितीन सावंत, सीसीआयएलचे चित्तरंजन कजवाळकर, त्रिष्टा कंपनीचे तरल शाह, एमएनसी हबीझचे संचालक नारायणन मार्गदर्शन करणार आहेत.

संदर्भ : दिव्य मराठी

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *