अमेरिकेकडून पहिल्यांदाच पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख ‘आझाद कश्मीर’ !
अमेरिकेने दिलेल्या एका अहवालात पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख ‘आझाद कश्मीर’ असा करण्यात आला आहे, ज्याचा भारताने कडाडून निषेध केला आहे. १९ जुलै रोजी अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने एक अहवाल सादर केला आहे. ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेरिरिझम’ असे या अहवालाचे नाव आहे. याच अहवालात पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख आझाद कश्मीर असा करण्यात आला आहे. या भागाचा उपयोग भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी केला जातो असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अमेरिकेच्या अहवालाची माहिती जेव्हा भारताला मिळाली त्यानंतर भारताने अमेरिकेच्या या अहवालाचा कडाडून निषेध केला आहे. तसेच अमेरिकेला यासंदर्भातली जाणीव करून दिल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी हे मान्य केले आहे की जम्मू काश्मीरचा उल्लेख करताना आमच्याकडून ‘आझाद कश्मीर’ असा उल्लेख झाला आहे. अमेरिका आजवर पाकव्याप्त काश्मीर असाच उल्लेख करत आली आहे. मात्र आझाद कश्मीर असा उल्लेख पहिल्यांदाच झाला असल्याचे अमेरिकेने मान्य केले आहे.
स्त्रोत : लोकसत्ता