पुणे : जिहादी प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलाची हत्या आईनेच केल्याची घटना पुण्यातील फुरसुंगीमध्ये रविवारी उघड झाली. या प्रकरणी हडपसर पोलिस तसंच देहली पोलिसांनी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुलाची आई वरिता (ऋती) (वय ४० वर्ष) आणि तिचा प्रियकर युनुस रहमत अली (वय ३३ वर्ष) अशी या आरोपींची नावे आहेत. देहलीत आजोबांसोबत राहणाऱ्या निकोलसचं (वय १३ वर्ष) या दोघांनी अपहरण केले होते. त्यानंतर मुलाचे आजोबा जोसेफ जॉल यांनी २ सप्टेंबर २०१५ रोजी देहलीच्या नेबसराई पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली होती. मात्र निकोलसला पुण्यात घेऊन आल्याचे वरिताने सांगितले आणि निकोलसचं आजोबांशी बोलणं करुन दिले. निकोलस सुखरुप असल्याचे कळल्यानंतर आजोबा निश्चिंत होते.
यानंतर निकोलससोबत ख्रिसमसाठी देहलीला येत असल्याचं वरिताने सांगितले. मात्र २४ डिसेंबर रोजी युनुस अलीने निकोलसच्या आजोबांना कॉल करुन, निकोलसने आत्महत्या केली असून त्याच मृतदेह राहत्या घरीच पुरल्याचे सांगितले. या कॉलमुळे आजोबांना धक्का बसला, त्यांनी देहली पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली.
देहली पोलिसांनी या दोन्ही आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे मोबाईल बंद होते. काही महिन्यांपूर्वी एका मोबाईलवरुन निकोलस आणि त्याच्या आजोबांशी बोलणे झाले होते. त्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता तो मोबाईल नंबर युनुस अलीच्या मित्राचा असल्याचे लक्षात आले. त्याच्या मित्राकडून अधिक माहिती घेतली असता अली फुरसुंगीतील बेंदवाडी इथे राहत असल्याचे कळले. या माहितीवरुन देहली पोलिस आणि हडपसर पोलिसांनी तपास करत अलीच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेऊन घटनास्थळाची पाहणी केली.
आरोपी ऋती आणि अली काही महिन्यांपूर्वी बेंदवाडी इथे राहण्यास आले होते. मात्र १९ डिसेंबरपासून ते फरार होते. शिवाय घराचा दरवाजा बंद असल्याने मुलाचा खून झाल्याचा संशय बळावला.
अखेर रविवारी सकाळी हडपसर पोलिस, देहली पोलिस, नायब तहसीलदार, पंच साक्षीदार, कमांड हॉस्पिटलच्या डॉक्टर पथकासह घरातील दिवाणाखालची फरशी काढली. त्याखाली खोल खड्ड्यात निकोलसचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. अत्यंत सराईतपणे सहा फूट लांबीचा आणि तीन फूट रुंदीच्या खोल खड्ड्यात मुलाचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यावर मोठे दगड आणि माती टाकून पुन्हा फरशी त्याच जागेवर बसवून त्यावर सोफा ठेवून आरोपींनी पळ काढला.
संदर्भ : एबीपी माझा