लेगिंगवर श्री हनुमानाचे चित्र !
अशा आस्थापनांना वैध मार्गाने धडा शिकवण्यासाठी हिंदूंनी त्याच्यावर बहिष्कार घालणेच योग्य ठरेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सीटल (अमेरिका) : येथे मुख्यालय असलेले अॅमेझॉन हे ग्राहकोपयोगी उत्पादने ऑनलाईन विक्री करणारे जगातील एक सर्वांत मोठे आस्थापन आहे. या आस्थापानाद्वारे हिंदूंची देवता श्री हनुमान यांचे चित्र छापलेल्या लेगिंग (पायात घालण्याचे एक वस्त्र) या उत्पादनाची विक्री करून देवतांचे विडंबन केले आणि जगातील कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या. तरी या आस्थापनाने श्री हनुमान यांच्या प्रतिमा असलेली उत्पादने विक्रीतून तात्काळ काढून घेण्याची आणि हिंदूंची जाहीर क्षमा मागण्याची मागणी करण्यात आली आहे. या आधीही अनेकदा अॅमेझॉनकडून हिंदु देवतांचे अशा प्रकारे विडंबन झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
हिंदू जनजागृती समिती आणि अमेरिकेतील हिंदु धार्मिक नेते श्री. राजन झेद यांनी अनेकदा अॅमेझॉनशी पत्रव्यवहारही केला आहे; मात्र त्याचा काही अपवाद वगळता परिणाम दिसून आला नाही. अद्यापही या आस्थापनाच्या अशा कृती चालूच आहेत.
Twitter : https://twitter.com/amazon
Facebook : https://www.facebook.com/amazon
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात