टोरंटो : येथील BAPS मंदिराच्या १०व्या स्थापना समारोहात सहभागी होण्यासाठी शनिवारी संध्याकाळी पंतप्रधान जस्टि ट्रुडो आले होते. त्यांनी भगवान स्वामीनारायणाचे दर्शन घेतले आणि जलाभिषेकही केला. समारोहात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आणि कॅनडातील भारतीचे राजदूत विकास स्वरूपही सहभागी झाले होते. बोचासंवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामी संस्था (BAPS) एक सामाजिक आध्यात्मिक संघटना आहे.
या वेळी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या मंदिराच्या कलासौंदर्याला पाहून, नि:संशय कॅनडाचे आर्किटेक्चरल आश्चर्यकारक आहे, असा गौरव केला. ते म्हणाले, लोक जेव्हा कॅनडाच्या सर्वात मोठ्या एअरपोर्टवर पियर्सन इंटरनॅशनलहून कॅनडाला येतात, तेव्हा हायवे ४२७ हून जाताना कॅनडाच्या प्रेक्षणीय ठिकाणांपैकी एक असलेल्या मंदिरात जरूर येतील. या मंदिराचा मला इतरांपेक्षा थोडा जास्तच अभिमान आहे.
BAPS चे प्रवक्ते नीलेश मेहता म्हणाले की, आज मला असे वाटते की, इतिहास स्वत:ची पुनरावृत्ती करतो. ते म्हणाले की, ही चमकणारी वास्तू हिंदू कॅनडावर प्रेम करत असल्याचे प्रतीक आहे. मेहता म्हणाले की, या मंदिराच्या निर्मितीत ६० हजार क्विंटल मार्बल वापरण्यात आले आहे. हे इटली आणि तुर्कीच्या खाणींतून आणण्यात आले आहे. १५०० जणांनी या पाषाणांवर नक्षीकाम केले आणि यानंतर येथे आणून तब्बल दीड वर्षांत त्यांना जोडण्यात आले. मंदिरात लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही. हे इतके मजबूत आहे की १००० वर्षेही याला काही होणार नाही. असे मंदिर भारतातही नाहीये !
स्त्रोत : दिव्य मराठी