अमली पदार्थांमुळे देशाची होणारी हानी इंडोनेशियाच्या लक्षात आली. भारतीय शासनही देशाची हानी होणार्या सूत्रांविषयी अशी सतर्कता दाखवून कायदे सिद्ध करील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
जकार्ता : इंडोनेशियामध्ये अमली पदार्थांची वाढती तस्करी पहाता राष्ट्रपती जोको विडोडो यांनी तस्करांना गोळ्या घालण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. यापूर्वी फिलिपिन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुर्तेते यांनीही असा आदेश दिला होता. विडोडो म्हणाले की, आम्ही अमली पदार्थांची तस्करी करणार्यांच्या विरोधात आहोत. जर ते अटकेला विरोध करत असतील, तर पोलिसांनी त्यांना गोळ्या घालून ठार करावे. कारण आम्ही देशात अमली पदार्थाच्या रूपात आपत्काळाचा अनुभव घेत आहोत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात