नाशिक येथे उपजिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घातली आणि तसा कायदाही केला आहे; मात्र त्याचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन येथील उपजिल्हाधिकारी श्री. शशिकांत मंगळुरू, तसेच शिक्षणाधिकारी श्री. नितीन उपासनी यांनाही हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी दिले.
राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी शाळांमध्ये देण्यासाठी परिपत्रक काढण्यास सांगणे आणि साहाय्य करण्यास तत्पर असणे
शिक्षणाधिकार्यांचा कृतीशील आणि आश्वासक प्रतिसाद !
समितीचे कार्यकर्ते शिक्षणाधिकारी श्री. नितीन उपासनी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांनी प्रेमाने सर्वांना बसण्यास सांगितले. ते म्हणाले, समितीचे सर्वच उपक्रम स्तुत्य असतात. तुम्ही तुमचे उपक्रम महानगरपालिकेच्या शाळांमध्ये घेऊ शकता. मी आताच तसे परिपत्रक काढायला सांगतो. त्याची एक प्रत तुम्हालाही देतो, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्यांनी त्वरित कर्मचार्यांना सर्व शाळांच्या नावाने परिपत्रक काढण्याचा आदेश दिला. ते म्हणाले, मी शासकीय कर्मचारी असल्याने तुमच्यासारखे कार्य करू शकत नाही; पण मी माझ्या मुलाला धर्माभिमानी करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला कधीही साहाय्य लागले, तरी मी ते करीन.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात