मुंबई पोलिसांनी हिंदूंसाठी असे कोणते उपक्रम केले आहेत का ? मुंबई पोलिसांचे हे वागणे आत्मघातकी ठरल्यास आश्चर्य ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : प्रशासनामध्ये अत्यंत अल्प प्रतिनिधित्व मिळालेल्या मुसलमान समाजाची प्रशासनातील टक्केवारी वाढवण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘मिशन दोस्ती’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. (प्रकल्पाच्या नावावरून मुंबई पोलिसांना मराठी भाषेचे वावडे आहे का, असा प्रश्न पडतो ! प्रकल्पाचे नाव मराठीत का ठेवले नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत मुसलमान समाजातील विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी व्यावसायिक पद्धतीने शिकवले जाणार आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात येथील अंजुमन इस्लाम सभागृहात याचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित रहाणार आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुसलमानबहुल विभागांमधील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्रेही पाठवण्यात आली आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात