Menu Close

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीकडून शहर दंडाधिकार्‍यांना निवेदन

बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करा !

शहर दंडाधिकार्‍यांना निवेदन देतांना (१) श्री. अरविंद गुप्ता आणि अन्य कार्यकर्ते

नोएडा (उत्तरप्रदेश) : सुरक्षा असतांनाही अमरनाथ यात्रेवर पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यामुळे पाकच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी आणि पाकला भारताने दिलेले ‘विशेष पसंतीचा देश’ ही श्रेणी रहित करावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून नोएडाचे शहर दंडाधिकारी महेंद्रकुमार सिंह यांना निवेदन देण्यात आले. बंगालमध्ये हिंदूंवर झालेल्या आक्रमणांच्या प्रकरणी तेथे राष्ट्रपती शासन लागू करावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली. या वेळी समितीचे श्री. अरविंद गुप्ता, राजरानी माहुर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *