मुसलमान तरुणाने हिंदु मुलीशी विवाह केल्याचे प्रकरण
समान नागरी कायद्याची नितांत आवश्यकता प्रतिपादित करणारी घटना ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
देहली : येथील १७ वर्षाच्या हिंदु मुलीचे धर्मांतर करून एका मुसलमान तरुणाशी विवाह लावण्यात आला होता. या प्रकरणी तरुणाच्या विरोधात बलात्कार आणि अपहरण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी देहलीतील एका विशेष न्यायालयाने या तरुणाला निर्दोष मुक्त केले आहे. मुसलमान धर्मानुसार तरुणी यौवनात येते तेव्हा ती विवाह करू शकते. त्यामुळे मुलीने मुसलमान धर्म स्वीकारला असल्याने आणि ती यौवनात असल्याने ती १७ वर्षांची असली, तरी कोणताही गुन्हा होत नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला.
गेल्या वर्षी या मुलीने घरातून पळून जाऊन मुसलमान तरुणाशी विवाह केला होता. पोलिसांत तक्रार केल्यावर तिला ५ महिन्यांनी बंगालमधून शोधून काढण्यात आले होते. या दोघांनीही विवाह केला होता. मुलीने मी स्वतःच तरुणाबरोबर गेले होते, असा न्यायालयात जबाब दिला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात